डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीच्या स्थळावरील काचेची तोडफोड सात एसटी बस फोडल्या, लाखोंचे नुकसान.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

परभणी : दि.11 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीच्या स्थळावरील काचेची तोडफोड केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.10) सायंकाळी व बुधवारी सकाळी संतप्त जमावाने राज्य परिवहन महामंडळा च्या बसेसवर तूफान दगडफेक केली. त्यात एसटीच्या सात गाड्यां चे मोठे नुकसान झाले आहे.या घटनेच्या पार्श्‍वभूमीवरमंगळवारी सायंकाळपासून परभणी आगारातून एकही बस आगारा बाहेर पडली नाही. संपूर्ण एसटी वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली. बुधवारीसुध्दा अधिकार्‍यांनी बसेस न सोडण्याचा निर्णय घेतला.त्याचा परिणाम एसटी बसेसचे मोठे नुकसान टळले. परंतु, प्रवाशांचे मोठे हाल झाले. बुधवारी सकाळ पासून शहरात कड कडीत बंद पाळण्यात आला. आंदोलनकर्त्यां नीही ठिकठिकाणी जथ्थ्यानिशी जावून बंदचे आवाहन केले. त्यातील काहींनी दगड फेकीचाही प्रकार केला त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. या दगडफेकीत, दुचाकी, तीनचाकी वाहनांना लक्ष करण्यात आले. खाजगी चारचाकी वाहनांवरही काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांनी बुधवारी रात्री उशीरापर्यंत एकही बस न सोडण्याचा निर्णय घेतला.मंगळवारी सायंकाळी 7 वाजता परभणी शहरात वसमत रस्ता जमावाने एसटी महामंडळाच्या सात गाड्यांवर जोरदार दगडफेक केली. त्यात परभणी च्या सहा व नांदेड डेपोची एका बसचा समावेश आहे. बसच्या काचा फुटल्याने सुमारे सव्वा लाखाचे नुकसा न झाले असून प्रवाशी वाहतूकीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती, परभणी आगार प्रमुख कळम यांनी दिली. तसेच परभणीत जमावबंदी लागू झाली असून पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही बस बाहेर पडणार नाही, असे ते म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.