यड्राव येथे देवेंद्रजी फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झालेबद्दल आनंदोत्सव साजरा .
यड्राव (प्रतिनिधी ) यड्राव येथे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची मुख्यमंत्री पदी तीन वेळा निवड झालेबद्दल शिरोळ तालुक्याचे भाजपचे नेते माधवराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी शिरोळ तालुका व भारतीय जनता पार्टी यड्राव यांच्यावतीने येथील राजर्षी शाहू महाराज चौक येथे लाडू वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला .
यावेळी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस औरंग शेख , जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष मिथुन बिरांजे , जिल्हा चिटणीस आनंदराव साने , कामगार संघटना विभागीय उपाध्यक्ष परसु कती , राजू टिळंगे , भरत आदमाने , इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
टिप्पण्या