एकसंबा येथे ट्रॅक्टरची दुचाकीला धडक ; एक ठार
एकसंबा येथील चन्नम्मा सर्कल नजीक ट्रॅक्टर दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात युवक ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. चाऊस शौकत डांगे (वय - ४२) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहिती अशी की, एकसंबा होऊन नणदी फॅक्टरीकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ( क्र. केए ४८ टीए ००२५) आणि मृत चाऊस शौकत डांगे हे शहरातील राणी चन्नम्मा सर्कलकडे जात असताना झालेल्या अपघातात चाऊस यांच्या हाता पायाला, पोटाला गंभीर दुखापत झाली. दरम्यान ट्रॅक्टर चालक फरार झाला आहे. जखमी चाऊस यांना अधिक उपचारासाठी बेळगावाकडे हलवताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्री उशिरा उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस स्थानकात झाली असून घटनास्थळी पोलीस स्थानकाचे एएसआय आर .आर. तळवार व सहकाऱ्यानी भेट देऊन पंचनामा केला. अधिक तपास सदलगा पोलीस करत आहेत.
टिप्पण्या