एकसंबा येथे उद्यापासून प्रेरणा उत्सव तीन दिवस चालणार विविध कार्यक्रम
एकसंबा तालुका चिकोडी येथील जोल्ले ग्रुपच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील भव्य प्रमाणात प्रेरणा उत्सव 2024 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने 26 ते 28 डिसेंबर तीन दिवस भरगच्च कार्यक्रम होणार असल्याची माहिती बसवज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
ते पुढे म्हणाले, सलग 13 वर्षांपासून एकसंबा शहरात प्रेरणा उत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे. गुरुवार दिनांक 26 रोजी सकाळी 9 वाजता जोतिबा पालखी मिरवणूक, सामूहिक गुग्गुळोत्सव आणि घरोघरी रांगोळी स्पर्धा, आंतरशालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, सायंकाळी 6 वाजता शिक्षण संस्थेचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दिनांक 27 रोजी सी.बी.एस.ई विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी पाककला आणि मेहंदी स्पर्धा, महिलांसाठी पारंपारिक ड्रेस स्पर्धा, शैक्षणिक संस्थेचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. तर शनिवार 28 रोजी एस.एस.एल.सी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, विशेष ऑलिम्पिक भारत कर्नाटक राज्यस्तरीय नृतोत्सव कार्यक्रम आणि ज्योतिप्रसाद जोल्ले यांचा वाढदिवस सोहळा व प्रेरणा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. वरील सर्व कार्यक्रम विविध स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात होणार असून नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन बसवप्रसाद जोल्ले यांनी केले. विशालक्रांती न्यूजसाठी अमर माने एकसंबा.
टिप्पण्या