क्रांतीसुर्य फाऊंडेशन कोल्हापुरच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने दिपक शेवाळे याना सन्मानित
क्रांतीसुर्य फाऊंडेशन कोल्हापुर यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2024 दिपक शेवाळे याना सन्मानित करण्यात आले. माजी.जी
पं.सदस्य मा.राजेंद्र पवार(वडर) , उद्योजक युवराज कोळी, सौ.मनिषा नाईक, सौ.हर्षदा परिट (महसूल सहाय्यक मुंबई), संस्थेचे अध्यक्ष विशाल मोरे, उपाध्यक्ष योगेश दाभाडे व मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. दीपक शेवाळे यानी आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यापैकी त्यानी आडी येथे 2018 पासून 'एक दिवस समाजासाठी' या उपक्रमातून दर रविवारी शालेय मुलाना योग्य मार्गदर्शन करणे, शालेय आभ्यासासोबत भौगोलिक माहिती मिळावी व योग्य संस्कार व्हावेत यासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत. गावातील आंबेडकर भवनची वेळोवेळी स्वच्छता करणे असे काम केले आहे. तसेच कोरोना काळात घरोघरी जाऊन योग्य माहिती देवून लोकांच्या मनातील भिती काढण्याचे कामं त्यानी केले आहे. त्यानी आजपर्यंत संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित शाळा व विविध गावात अनेक व्याख्यानद्वारे समाजाला जागृत करण्याचे काम केले आहे. निपाणीसह परीसरातील सामाजिक चळवळीमध्ये नेहमी सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यानी गावामध्ये विविध मागण्यांसाठी वेळोवेळी आवाज उठविलेला आहे. समाजातील कोणत्याही व्यक्तिचे काम असो ते नेहमी अग्रेसर असतात. या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी आडीमधून रत्नाप्पा वराळे, शंकर भोसले, आनंदा शेवाळे, राहुल भोसले, सुनिल होसमनी, बाळकृष्ण मधाळे, प्रविण शेवाळे, रणजीत शेवाळे, संगीता शेवाळे, ज्योती शेवाळे उपस्थीत होते.
निपाणीहून विशालक्रांती न्यूज साठी साताप्पा कांबळे
टिप्पण्या