यड्राव येथील प्लाॕटधारक तिव्र आंदोलनाच्या पावित्यात .

यड्राव (प्रतिनिधी ) यड्राव (ता . शिरोळ ) येथे औद्योगिक वसाहत आसल्याने येथे स्थायिक होणारे कष्टकरी , कामगार वर्ग , मजूर व उद्योजक मोठ्या प्रमाणात येथे आहेत . सन 2002 ते सन 2015 या कालावधीत प्रथमेश , संभव , पार्श्वनाथ , मँचेस्टर यासारख्या विकसकांनी जमिनी घेऊन रितसर प्लाॕटींग करुन विकसीत केल्या . अशा प्रकारचे प्लाॕटींग सर्वसामान्य लोकांना खरेदी करणे आवाक्याच्या बाहेर आहे , आणि ते गोरगरिबांना न परवडणारे आहे . असे यड्राव हद्दीतील प्लाॕटींग खरेदी करुन घराचे स्वप्न पहात असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करुन 7 / 12 आणि डायरी उतारा नोंद रद्द करण्यास भाग पाडले . यामध्ये गोरगरिब,  कष्टकरी प्लाॕटधारकांचे हक्काचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण राहीले .                                              तसेच गट नं . 505 , 506 मधील सर्वसामान्य , कष्टकरी नागरीक आहेत . असे असताना शिरोळ तहसिलदार यांनी दि . 10 / 10 / 2024  रोजीच्या पत्रानुसार गट नं . 505 व 506 यामधील एकूण 39 प्लाॕट पैकी फक्त 25 प्लाॕटचे फेरफार नोंद रद्द करण्याचा आदेश पारित केला आहे . सदरील कारवाई ही सुडबुध्दीने केल्याचे यातून दिसून येते . ज्या तक्रारदाराने तक्रार केली त्याने विकसकावर कारवाई करण्याचे सोडून सर्वसामान्य प्लाॕटधारकांच्यावर कारवाई केली आहे . यामगचा अर्थ समजत नाही . त्यामुळे तक्रारदाराबाबत प्रचंड असंतोष  निर्माण झाला आहे . याची परिणीति म्हणून जिल्हाधिकारी , प्रांताधिकारी , तहसिलदार आणि ग्रामपंचायत यड्राव यांचे प्लाॕटधारकांच्यावर जी कारवाई केली तीच कारवाई यड्राव हद्दीतील ज्या ज्या गट नंबरमध्ये ओपन स्पेस सोडलेला नाही , त्या गट नंबरातील सर्व 7 / 12 , डायरी उतारा , फेरफार नोंदी रद्द करण्यात याव्यात असे नमूद करण्यात येत आहे . यासाठी सर्व अन्यायग्रस्त सर्वसामान्य प्लाॕटधारकांनी एकत्रीत येऊन  आंदोलन , उपोषण व आत्मदहन यासारखे तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे .                                     चौकट .                                                संजय बाबासो पाटील रा . विक्रमनगर इचलकरंजी यांनी सदरच्या फेरफार बाबतीत तक्रार दाखल केली होती . सदरील तक्रार त्यांनी मागे घेऊन सुध्दा तहसिलदार यांनी कारवाई सुरू ठेवली आहे . याबाबत सुध्दा प्लाॕटधारकांमध्ये संशय निर्माण झालेला आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.