माहीती अधिकार प्रभावीपणे राबावा !महेश सारणीकर यांचे प्रतिपादन.

भारज प्रतिनिधी- राजेश दामधर.
जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद येथील शासकिय विश्राम गृह येथे नुकतीच माहीती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीची बैठक संपन्न झाली या निमित्ताने या समितीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री महेशजी सारणीकर समितीचे अमरावती विभाग संघटक श्रीमान सारंग महाजन जालना जिल्हा उपाध्यक्ष श्री गोंविदजी जोशी जालना जिल्हा सचिव श्री जगन्नाथ जी घोडे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते पूढे बोलतांना महेशजी म्हणाले की माहीती अधिकार हा कायदा 2005 ला लागू झाला आणि सामान्य माणसाला प्रशासकिय आणि शासकिय योजनांचा समावेश आहे अशी माहिती मिळायला मदत झाली हा माहितीचा अधिकार सक्षमपणे आणि प्रभावीपणे अंमलबजावणी केली पाहिजे तसेच पत्रकार आणि मिडीया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे सामान्यतल्या सामान्य माणसाचा आवाज आणि आरसा आहे पत्रकारांनी स्वच्छ , निर्मळ , पारदर्शक पणे निस्वार्थ पणे काम केले पाहिले आणि धाडशी वृत्तीने लिखाण केले पाहीजे यावेळी सारंगजी महाजन यांनी ही समितीच्या कार्यावर प्रकाश टाकला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे जाफ्राबाद तालुकाध्यक्ष श्री अशोकजी म्हस्के यांनी केले तर प्रास्ताविक समितीचे जाफ्राबाद तालूका कार्यध्यक्ष श्री राजेशजी दामधर यांनी केले यावेळी समितीचे देऊळगाव राजा तालुकाध्यक्ष श्री सुरेशजी धारे जाफ्राबाद तालूका उपाध्यक्ष श्री रामजी ससाणे जाफ्राबाद तालूका सचिव श्री ज्ञानेश्वर निकाळजे सहसचिव श्री गजानन फलफले देऊळगाव राजा तालूका उपाध्यक्ष कारभारी गायकवाड , सौ. गोदावरीताई लेंभे , श्री सुरेशजी खंदाडे , श्री दिनकर जी जंजाळ , श्री साहेबराव जी म्हस्के , श्री समाधान जी निकाळजे, श्री परमेश्वरजी भालेराव , श्री अनिलजी ससाने आदी तालूका आणि सर्कल पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री भाउसाहेबजी आव्हाड यांनी मानले अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.