हुपरीत तीन वेगवेगळ्या अपघातात एक महिला ठार तर तीन जण जखमी..
तालुका हातकणंगले येथे आज वेगवेगळ्या ठिकाणी शहरामध्ये तीन ठिकाणी अपघात झाला या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर तीन जण जखमी झाले
त्यापैकी १ हुपरी पोलीस ठाण्यासमोरच्या अपघातात चार चाकी गाडी क्रमांक MH 09 GA 4222 ने मोटार सायकल क्रमांक MH 09 E 8333 ला धडक दिल्यामुळे कुमार अनंत कुलकर्णी, रा.इंगळी हा गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरला नेण्यात आले.
तर जवाहर साखर कारखाना चौपाटी समोर दोन मोटार सायकलीची धडक झाल्याने युवराज जाधव,ओंकार जाधव रा.रांगोळी हे जखमी झाले आहेत.
तर श्री.अंबाबाई देवालय कमानी समोर झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला घटनास्थळावरून मिळाली माहिती अशी की कागल डेपोची एसटी क्र MH 07 C 9170 इचलकरंजी कागल ही नवीन बस स्टॅन्ड हून जुन्या बस स्टँड कडे येत असताना एस.टी चा ब्रेक फेल झाल्याने डिस्कवर बजाज MH 09 BR 9338 ला जोराची धडक दिल्यामुळे त्यावरील चालक व मागे बसलेली महिला ही खाली पडल्यामुळे डोळ्याला जोरदार मार लागून जागीच ठार झाली.
चालक वैभव रावसाहेब जाधव (रा.सांगवडे) यास जोरदार दुखापत झाल्याने त्यांना कोल्हापूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले या अपघातात मयत झालेल्या स्मिता चंद्रकांत पाटील वय वर्ष 32 ह्या वरद गुरुकुल सैनिकी पॅटर्न निवासी संकुलाच्या संचालिका आहेत.
याबाबत हुपरी पोलीस स्टेशन मध्ये एसटी चालक विनायक दिनकर चौगुले वय वर्ष 37 कागल डेपो राहणार चिमगाव यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे या घडलेल्या सर्व ठिकाणी माहिती मिळताच हुपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई करीत आहेत.
टिप्पण्या