दहावीचे वर्गमित्र तब्बल २१ वर्षांनंतर आले एकत्र

पारडगाव : अनेकांनी जुन्या आठवणींना दिला उजाळा

घनसावंगी प्रतिनिधी

शालेय जीवन म्हणजे सर्वांसाठी एक प्रकारचा सुवर्णकाळ असतो.माणुस वय,पद, किंवा संपत्तीने कितीही मोठा असला तरी त्याला त्याचे शालेय जीवन आठवत असतो.अशाच प्रकारे शालेय आठवणींना उजाळा देण्यासाठी घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील सन २००२-२००३ या शैक्षणिक वर्षांतील दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधत स्नेहमेळावा घेतला.

यावेळी वर्गमित्रांनी तब्बल एकवीस वर्षांपुर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.व चालू वर्तमानकाळात कोण काय करतो याबाबत देखील एकमेकांशी संवाद साधत होते.शेवटी सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत यापुढे देखील प्रत्येकवर्षी स्नेहमेळावा आयोजित करण्यात येईल,असा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष खोसे, दत्तात्रय खिल्लारे, संजय कामठे, सेवानिवृत्त शिक्षक टी.बी.जईद, अनिल माकोडे,रविंद्र आकणीकर,खरात, सचिन बाहेकर, राजेश नवल, मुकुंद खंदारे यांच्यासह विद्यार्थी गोविंद उफाड, ओमप्रकाश हजारे, सोमनाथ हजारे, रमेश सुरशे,मंगल ढेरे, अर्चना विभूते,डॉ.प्रल्हाद सुरशे,विष्णू माकोडे, आदी विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद उफाड यांनी केले तर  विश्वनाथ रगड यांनी उपस्थितांचे आभार मानले.

*सेवानिवृत्त शिक्षक श्री.पवार यांनी फोनद्वारे दिल्या शुभेच्छा...!*

लालबहादूर शास्त्री विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक बाजीराव पवार प्रकृती ठिक नसल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना फोनद्वारे संवाद साधत शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.