विजयपाल चौगुले यांची शिरोळ तालुका अध्यक्षपदी निवड
शिरोळ – हरोली येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विजयपाल बाबुराव चौगुले यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या या समितीच्या कार्यात चौगुले यांचे योगदान लक्षणीय ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
कोल्हापूर येथे आयोजित समितीच्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र त्रिवेदी यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. तसेच राज्याध्यक्ष शंकर पाटील यांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
विजयपाल चौगुले हे सामाजिक कार्यात सक्रिय असून, त्यांनी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात भ्रष्टाचार निर्मूलन आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने भरीव कार्य होईल, असा समितीला विश्वास आहे.
या निवडीमुळे हरोलीसह संपूर्ण शिरोळ तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, चौगुले यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
टिप्पण्या