" सकल हिन्दू समाज, मोशी शहर यांच्या वतीने " श्री हनुमान मंदिरात, सायंकालीन आरती संपन्न...

पुणे (मोशी) : शनिवार दिनांक 14/12/2024 रोजी सकल हिन्दू समाज मोशी शहर यांच्या वतीने सायं. 07:30 वाजता महाआरती ,श्री राम नामघोष ,मारूती स्तोत्र, हनुमान चालीसा सामूहिक पठनाचे आयोजन करण्यात आले होते. 
जून 2023 पासून "सकल हिन्दू समाज,  मोशी शहर या नावाने" श्री हनुमान महाआरती, हा उपक्रम सुरू केला आहे. 
दर शनिवारी होणारा महाआरती सोहळा या शनिवारी देखील सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये अतिशय आनंदी, उत्साही व भक्ती भावाने पार पडला. या महाआरती सोहळ्या साठी अनेक भाविक भक्त व महिला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिति होती. त्यावेळी भाविक व ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात आरतीचा व प्रसादाचा लाभ घेतला आज अवधूत योग योगेश्वर भगवान श्री दत्तात्रेय यांचा प्रकट दिन देखील, भाविकांच्या उपस्थितित भक्तिभावाने साजरा करण्यात आला. आजच्या महाआरतीचा व महाप्रसादाचा मान सपत्नीक श्री अजित गिरी सौ. ज्योती गिरी रा. साई कॉलनी लक्ष्मी नगर ता. हवेली जिल्हा पुणे यांना देण्यात आला. 
आजच्या महाआरती सोहळ्या साठी ह.भ.प विठ्ठल महाराज गवळी हे उपस्थित राहिले त्यांनी आपल्या ओजस्वी वाणीने उपस्थित भाविकांना अतिशय सुंदर रित्या उद्बोधन केले. त्याच प्रमाणे आजच्या आरतीसाठी( पत्रकार) व राष्ट्रीय धर्म हिन्दू संघटनेचे, संघटन मंत्री श्री हंसराज पाटील उपस्थित होते. 
या संपूर्ण कार्यक्रमासाठी" सकल हिन्दू समाज मोशी शहर (संस्थापक-अध्यक्ष श्री प्रविण भाऊ राम गोरे, कार्यकारिणी सदस्य वीरभद्र निरने , बाळासाहेब हिंगणे , प्रकाश पाटील, नितीन बोपीलवार , सुरेश पांचाळ, अमोल पाटील, पुष्कर झुरंगे, रोहन चांदगुडे, संकेत गावडे, अंकुश उपाध्ये, प्रतिक पाटील, प्रणय बरबडे, प्रथमेश गायकवाड, निखिल घटेकरी ,विनायक शेंदूरे ,संतोष येम कर , मंगेश गीते, शशी यादव, गणेश आल्हाट,सागर सोंदडे ,अनिकेत बागल, आकाश धडस ,विरेष घूमटे ,प्रसाद हांडे, विलास कोळेकर, गणेश वाघमारे, प्रकाश बनकर, राजू भाई चौधरी, रविराज चव्हाण , सिद्धार्थ कडतरे हे सर्वजन या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.