व्यापार्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा -मेघना बोर्डीकर यांची मागणी.
शिवाजी शिंदे
परभणी : दि.11 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृतीच्या स्थळावरील काचेच्या तोडफोडीची घटना निश्चितच दुर्देवी आहे. त्या घटनेतील आरोपीं विरोधात कठोर भूमिका घ्यावी, त्याच बरोबर बुधवारी (दि.11) काहींनी व्यापारीपेठांमधून केलेल्या दगडफेकीसह जाळपोळीच्या घटनेत मोठा तडाखाबसलेल्या व्यापार्यांच्या नुकसा नीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत, तसेच तोड फोड व जाळपोळ करणार्या समाज कंटकांवर लवकरात लवकर ओळख पटवून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केली.आमदार बोर्डीकर यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हा धिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेतली. संपूर्ण घटनेची माहिती घेतली. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांनी शांतता आणि संयम राखावा, असे आवाहनही करण्यात आले आहे, असे गावडे यांनी नमूद केले. यावेळी आमदार बोर्डीकर यांनी नुकसानग्रस्त व्यापार्यांचे तात्काळ पंचनामे करावेत, वेगवेगळ्या घटनां मधील समाजकंटकां ची ओळख पटवून गुन्हे दाखल करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते सुनील देशमुख, रितेश जैन,माजीनगरसेविका सौ. मंगल मुदगलकर, राहुल कनकदंडे, सुशील शर्मा आदी उपस्थित होते.
टिप्पण्या