खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर संचलित,खोतवाडी हायस्कूल,खोतवाडी ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथे विश्वरत्न.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांच्या हस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन संपन्न झाले.
    यानंतर विद्यालयातील विद्यार्थीनी कु.नदाफ साजिदा,इ.7 वी, हिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती मनोगतातुन व्यक्त केली.यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी आपल्या मनोगतातुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्या विषयी व शैक्षणिक कार्याविषयी माहिती आपल्या मनोगतातुन सांगितली.
      या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थीनी, शिक्षक -शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
   या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.एस.बी.चौगुले यांनी केले तर आभार श्री.कांबळे एस.एम.यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.