ढोणेवाडी येथील सूरज व प्रथमेश या युवकांची सैन्य दलात निवड या निवडीने रोवला ढोणेवाडी वैभवात मानाचा तुरा.मिरवणूक द्वारे आनंद केला साजरा.
नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्र सरकारच्या विविध सैन्य भरतीच्या निवड यादीत ढोणेवाडी ता.निपाणी येथील दोन युवकानी घवघवीत यश मिळविल्याने त्यांची मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.गरीब कुटुंबातील या युवकांनी मेहनतीने स्वप्न साकार केल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. विशेष म्हणजे दोन्हीही युवकांचे वडिल यंत्रमाग कामगार आहेत.
स्टाफ सिलेक्शन च्या माध्यमातून सैन्य दलामध्ये भरतीचे अर्ज मागविण्यात आले होते .यावेळी ढोणेवाडी येथील दोन युवकांनी यश मिळविले आहे .यामध्ये सूरज जयराम कांबळे यांची केंद्रीय राखीव पोलीस फोर्स मध्ये निवड झाली आहे.घरची परिस्थिती बेताची असुन वडील यंत्रमाग कामागर आहेत. अत्यंत खडतर परिस्थितीतून सूरज याने प्रयत्न केला .भाऊ सुशांत व शुभम यांनीही साथ दिल्याने सैन्य दलात दाखल झाला आहे.त्याने दलित समाजातील पहिला सैनिक होण्याचा बहुमान मिळवला आहे.
प्रथमेश राजू सावंत या युवकाची सीमा सुरक्षा दल मध्ये निवड झाली आहे.वडील यंत्रमागावर काम करतात.घरची परिस्थिती बेताची होती. जिद्द चिकाटीच्या जोरावर त्यांनीही यश मिळविले आहे.सैन्य दलात भरती झाल्याने ढोणेवाडी ग्रामस्थांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजीत त्यांची मिरवणूक काढुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बोरगांव हुन प्रतिनिधी अजित कांबळे.
टिप्पण्या