प्रत्येकाच्या आरोग्यासाठी मधु तारा प्रत्येकांसाठी
दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आणि आम्ही गोराईकर जागृत संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पश्र्चिम मुंबई बोरिवली येथे भव्य मोफत महाआरोग्य शिबिर पार पडले.
मधु तारा आरोग्य समिती प्रमुख श्री रमेशजी शेळके यांच्या माध्यमातून भक्ती वेदांत हॉस्पिटल मिरा रोड यांच्या सहकार्याने शिबिर नियोजित करण्यात आले.या वेळी असंख्य गोराईकर यांनी आपल्या आरोग्याची तसेच नेत्र तपासणी करून घेतली.
या वेळी मधु तारा फाउंडेशनच्या पद नियुक्ती करण्यात आली.हाई कोर्ट एड योगिता सावंत यांना पश्चिम मुंबई उपाध्यक्षा.प्रेरणा राणे यांना गोराई बोरिवली उपाध्यक्षा.अर्चना चव्हाण यांना बोरिवली गोराई अध्यक्षा या पदावर नियुक्ती करण्यात आली.
या प्रसंगी गुरुवर्य श्री धनंजय पवार सर.सामाजिक कार्यकर्ते श्री हुसैन भाई.श्री उमेश महाडिक.रुग्ण अधिकार परिषद प्रमुख श्री सुनील शेजवळ.तसेच असंख्य आम्ही गोराईकर जागृत संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी मधु ताराच्या कार्याची प्रशंसा गोराईकर पदाधिकारी यांनी केली.
श्री धनंजय पवार साहेब.श्री सुनील शेजवळ सर.श्री उमेश महाडिक यांनी आपल्या कार्याचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी सर्वांनी मधु तारा सोबत जुळून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून कार्य करावे असे आवाहन केले. तसेच भक्ती वेदांत हॉस्पिटलचे सहकार्याबद्दल आभार मानले.
या वेळी असंख्य नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
टिप्पण्या