केशवराज बाबासाहेब महाराज यात्रा महोत्सव.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. 

सेलू  :  दि.7 शिर्डीचे संत साईबाबांचे सद्गुरू व शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब महाराजांचा पंचक्रो शीतील महान यात्रा महोत्सव दि.८ डिसेंबर पासून सुरू होत आहे.
दि. ८ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधी त मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या या यात्रा महोत्सवात दररोज  श्रीच्या मूर्तीस लघुरुद्र व पवमान अभिषेक, अखंड हरिनाम सप्ताह, श्री गुरुचरित्र पारायण, हरिपाठ, महिला मंडळाचे भजन. रात्री कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
नादविहार संगीत परिवार, सेलू यांच्या वतीने अखंड विष्णुसहस्रनाम सप्ताह तसेच विवेक  मंडलिक व गोविंद मंडलिक यांचे शुक्ल यजुर्वेद संहिता पारायण तर सारंग रामचंद्र सराफ, ओंकार नर्सिकर यांचे ऋग्वेद शाकल संहिता पारायण होणार आहेत. दि.८ ते १४ डिसेंबर या कालावधीत भागवताचार्य नंदकिशोर महाराज गोंदीकर यांच्या अमृततुल्य व रसाळ वाणीतून श्रीमद भागवत कथेचे निरूपण सकाळी ११ ते ४ या वेळेत होणार आहे.दि. ८ ते १० डिसेंबर या कालावधी त दररोज रात्री ९ वाजता बालासाहेब महाराज नेब (समर्थ जांब) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
११ डिसेंबर रोजी केशवराज बाबासाहेब महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे सकाळी ७ ते ९ या वेळेत केशवराज बाबासाहेब महाराजांच्या ओवी बद्ध चरित्राचे सामूहिक ३ पाठ होणार आहेत.९ वाजता श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण १८ अध्याय पठन व सायंकाळी श्री ची आराधना, अभिषेक व महापूजा होणार आहे. तसेच रात्री ९ वाजता केशवराज बाबासाहेबां च्या चरित्रावर रेडिओ स्टार   वसंतबुवा मंडलिक यांचे कीर्तन होणार आहे.
ता. १२ व १३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता परभणी येथील शंकर महाराज आजेगावकर यांचे कीर्तन होणार आहे.दि. १४ डिसेंबर रोजी श्रीमद भागवत कथेची समाप्ती होणार असून दुपारी अशोक काकडे यांच्या वतीने भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९ वाजता माऊलीच्या दिंडीतील मानकरी पुरुषोत्तम महाराज वालुरकर यांचे कीर्तन होणार आहे.दि.१५ डिसेंबर हा या यात्रा महोत्सवाचा मुख्य दिवस असून दुपारी वाजता श्री  ची महाआरती, तीर्थ प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी  श्री  ची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. दि. १६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता  भागवतकार व कीर्तन सम्राट सुनील महाराज आष्टीकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.या यात्रामहोत्सवात सेलूतील महिला व पुरुष भजनी मंडळ तसेच मृदंगाचार्य विठ्ठल काळे, सदाशिव समेळ, बाबासाहेब खुपसेकर,भास्कर डासाळकर, सुधाकर शिंदे, तबला वादक केदार तांबट हे उपस्थित राहणार आहेत. संवादिनी साथ  नागनाथराव विडोळीकर, वसंतबुवा मंडलिक तर गंगाधर कान्हेकर हे देणार आहेत.या महोत्सवात लघरुद्र अभिषेक करू इच्छिणार्यांनी वामन नारायणराव मंडलिक यांच्याशी संपर्क साधावा.तरी या महान यात्रा महोत्सवात शहरातील व परिसरा तील भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शनाचा, श्रवणाचा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केशव, वामन व पुरुषोत्तराम नारायणराव मंडलिक यांनी तसेच व्यापारी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.