‘मी कसा घडलो’ संयोजन समितीची बैठक संपन्न
नांदेड दि.०८ ः दरवर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तिमत्त्वाना मी कसा घडलो, संयोजन समितीच्यावतीने दिला जाणारा पुरस्कार वितरणाच्या संदर्भाने रविवारी आयटीआय चौक येथे बैठक संपन्न झाली.
या बैठकीत शैक्षणिक, सामाजिक, कृषी, कला, उद्योजक, साहित्य आणि इतर क्षेत्रातील कार्य करणार्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. २०२५ या वर्षाचा पुरस्कार ‘जगणं दुनियादारीच’ या पुस्तकाच्या नावाने देण्याचे संयोजन समितीने ठरविले. २६ फेब्रुवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे
रविवारी झालेल्या बैठकीला संयोजन समितीचे सोनू दरेगावकर, राहुल वाघमारे, अविनाश पाईकराव, दत्तप्रसाद तालीमकर, विनोद पाचंगे यांची उपस्थिती होती.
टिप्पण्या