जीवनात डोळ्यांची काळजी घेणे अधिक महत्वाचे.हाल शुगर उपाध्यक्ष पवनकुमार पाटील यांचे मत. कारखाना परिसरात नेत्र चिकित्सा कार्यक्रम संपन्न.

बोरगांव / प्रतिनिधी. 
सृष्टीतील सजीवांना अन्न व प्राणवायू जितका आवश्यक आहे,तितकेच डोळे असणे महत्वाचे आहे, जे जन्मापासून अंध आहेत त्यांना जग पाहण्यासाठी दृष्टीची नितांत गरज आहे मात्र दुर्लक्षामुळे अनेकांचे डोळे गेलेले आहेत. त्या कारण दृष्टी असलेल्यांनी डोळ्यांचा रक्षणासाठी वेळेवर काळजी घेणे अत्यावश्यक आहे असे मत निप्पाणीतील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन कुमार पाटील यांनी केले. ते साखर कारखान्याच्या वतीने आयोजित जोल्ले उद्योग समूह प्रेरणा उत्सवाच्या निमित्ताने  कारखाना व अंकुर हॉस्पिटल निपाणी कोल्हापूर यांच्या वतीने कारखान्याच्या परिसरातील कामगारांच्या साठी नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
      प्रारंभी धनवनत्री देवीचे पूजन उपस्थीत मान्यवर व नेत्र शिबिराचे डॉक्टर्स,कारखाना चे MD, अप्पासाहेब शिरगावे यांच्या हस्ते करण्यात आले.
      पुढे म्हणाले बोलतांना पाटील म्हणाले की माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या 
मार्गदर्शनाखाली आमच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या करिअरच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. साखर कारखाना ऊर्जितावस्था येण्या साठी कामगारांचे पात्र महत्वाचे असते, मा ज्योती प्रसाद जोल्ले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कारखाना व अंकुर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात १३७ हून अधिक कर्मचाऱ्यांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. अंकुर अग्रवाल नेत्र रुग्णालय, निपाणी येथील वरिष्ठ नेत्रतज्ज्ञ व त्यांच्या पथकाने तपासणी कार्यासाठी विशेष परिश्रम घेतले असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
    यावेळी हाल सिद्ध नाथ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील,संचालक समित ससाणे,शरद जंगटे, किरण निकाडे, वैशाली निकाडे, सुकुमार पाटील, प्रकाश शिंदे, जयवंत भाटले, सुनील पाटील, सर्जेराव पाटील, सुहास गुगे, कार्यकारी संचालक अप्पासाहेब शिरगावे, वैद्यकीय अधिकारी एस. आर. पाटील, रवींद्र पाटील, अनिल पाटील, जीएम प्रोसेसर इंजिनिअर कैंपण्णा गिजवणे, विविध विभाग प्रमुख व साखर कारखान्याचे सर्व कर्मचारी  उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.