अथणी येथील अर्धवट अवस्थेतील इंदिरा कॅन्टीन.

अथणी  प्रतिनिधी

राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागात गरीब जनतेला कमी दरात जेवण आणि नाश्ता पुरवण्याच्या हेतूने सरकारने अन्नपूर्णा योजनेअंतर्गत इंदिरा कँटीन सुरू केली आहे. पण ती योजनेचे अंमलबजावणी किती पातळीवर होत आहे हा एक मोठा प्रश्न आहे.

अथणी नगरपालिकेच्या हद्दीत अयोग्य ठिकाण निवडून   नगरपालिकेच्या व्यावसायिक गळ्यांच मागील बाजूस,
म्हणजेच जनतेला न दिसण्यादरखे व सरकारी बागायती विभागाच्या कार्यालयासमोर   मोकळ्या जागेत ही इंदिरा कँटीन उभारली जात आहे.

अथणी शहरातील बागायती विभागाच्या  कार्यालयाच्या बाजूला दोन वर्षांपासून सुरू असलेल्या इंदिरा कँटीनच्या बांधकामाची खरी स्थिती पाहिल्यावर नागरिकांना सरकारवर संताप व्यक्त होत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शहरात इंदिरा कँटीनच्या नावाखाली बांधकाम सुरू आहे. पण हे बांधकाम अर्धवट पडून कचऱ्याचे ठिकाण बनले आहे. दररोज जेवण आणि नाश्ता करण्याचे पवित्र ठिकाण मलमूत्र विसर्जनाचे आणि अनैतिक कृत्यांचे ठिकाण बनले आहे. 

अथणी नगरपालिकेच्या हद्दीत अशास्त्रीय ठिकाण न मोकळ्या जागेत उभारली जात असलेल्या इंदिरा कँटीनची बांधकामाची कामे हाती घेणारे  ठेकेदार बांधकाम अर्धवट सोडून गेल्या सारखे दिसत असल्याचे  म्हटले जात आहे.

कचऱ्याच्यआ कुंडी च्या रूपांतर झालेली ही इंदिरा कँटीनची बांधकाम पूर्ण करण्यात आणि स्वच्छता राखण्यात नगरपालिका तसेच प्प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारी या अपूर्ण कामाकडे लक्ष देऊन नागरिकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी पाऊल उचलावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.