अकिवाट येथे महापूरात ट्रक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातातील मृतदेह चार महिन्यांनी सापडला

अकिवाट येथे 2 आॅगष्ट रोजी महापूरात ट्रक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातातील इकबाल बैरागदार यांचा मृतदेह तब्बल चार महिन्यांनी देसाई इंगळी येथेसापडला आहे. 

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, कर्नाटकात चिक्कोडी तालुक्यातील देसाई इंगळी येथे इकबाल बैराकदार यांचे मृतदेहाचे अवशेष सापडले आहेत. त्यांची ओळख मोबाईल व कपड्यांवरून निश्चित करण्यात आली आहे. 2 ऑगस्ट रोजी महापुराच्या दरम्यान ट्रॅक्टरच्या माध्यमातून रस्ता पार करत असताना झालेल्या अपघातात ते बेपत्ता झाले होते. या दुर्घटनेत 6 व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी अण्णासाहेब हसुरे व सुहास पाटील यांचे मृतदेह यापूर्वीच सापडले होते, मात्र बैराकदार यांचा मृतदेह अद्याप सापडला नव्हता.

चार महिन्यांनंतर देसाई इंगळी येथील नदीकाठच्या शेतामध्ये त्यांचे मृतदेहाचे अवशेष सापडल्याचे समजते. घटनास्थळी बैराकदार यांचे नातेवाईक पोचले आहेत.

विशाल क्रांती न्यूजसाठी
सचिन मठपती अकिवाट.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.