जीवनात डोळ्यांची काळजी घेणे अधिक महत्वाचे.हाल शुगर उपाध्यक्ष पवनकुमार पाटील यांचे मत. कारखाना परिसरात नेत्र चिकित्सा कार्यक्रम संपन्न.
बोरगांव / प्रतिनिधी. सृष्टीतील सजीवांना अन्न व प्राणवायू जितका आवश्यक आहे,तितकेच डोळे असणे महत्वाचे आहे, जे जन्मापासून अंध आहेत त्यांना जग पाहण्यासाठी दृष्टीची नितांत गरज आहे मात्र दुर्लक्षामुळे अनेकांचे डोळे गेलेले आहेत. त्या कारण दृष्टी असलेल्यांनी डोळ्यांचा रक्षणासाठी वेळेवर काळजी घेणे अत्यावश्यक आहे असे मत निप्पाणीतील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन कुमार पाटील यांनी केले. ते साखर कारखान्याच्या वतीने आयोजित जोल्ले उद्योग समूह प्रेरणा उत्सवाच्या निमित्ताने कारखाना व अंकुर हॉस्पिटल निपाणी कोल्हापूर यांच्या वतीने कारखान्याच्या परिसरातील कामगारांच्या साठी नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रारंभी धनवनत्री देवीचे पूजन उपस्थीत मान्यवर व नेत्र शिबिराचे डॉक्टर्स,कारखाना चे MD, अप्पासाहेब शिरगावे यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे म्हणाले बोलतांना पाटील म्हणाले की माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या करिअरच्या विकासासाठी अनेक य...