निपाणी येथे रविवार १० रोजी होणाऱ्या लिंगायत आंदोलनास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ..... जगद्गुरु बसवजय मुर्त्युंजय स्वामीजी
लिंगायत समाज आरक्षण अभावी मागास राहीला आहे.त्यामुळे समाजाची प्रगती खुंटली आहे.शिक्षण, उद्योग आणि राजकारणासाठी या समाजाला २-ए आरक्षण मिळावे यासाठी हा लढा सुरू आहे.त्यामुळे सरकारवर दबाव आणण्यासाठी समस्त लिंगायत समाजातर्फे निपाणी येथे रविवार दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनामध्ये सभा घेऊन त्यानंतर पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर इष्ठलिंग पुजन करत महामार्ग रोखण्यात येणार आहे.त्यामध्ये समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कुडलसंगम येथील पंचमसाली मठाचे जगद्गुरु बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांनी केली आहे.
स्वामीजी म्हणाले की, लिंगायत समाजाची संख्या दोन कोटी पेक्षा जास्त आहे.तरीही आरक्षण अभावी सरकार कडून कोणत्याच सवलती मिळत नाहीत.त्यासाठी व्यापक आंदोलन सुरू आहे.२-ए प्रवर्गामध्ये समावेश होऊन संपूर्ण लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे याबाबत कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री - सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री -डी.के.शिवकुमार यांच्याकडे मागणी केली असुन त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.मात्र अद्याप कर्नाटक सरकारने निर्णय न दिल्याने सरकारला जागे करण्यासाठी रविवार दिनांक १० सप्टेंबर रोजी आंदोलन केला जाणार आहे.या आंदोलनात सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे.
टिप्पण्या