सुनिल आवळे यांना मानवसेवा पुरस्कार जाहीर

यड्राव (प्रतिनिधी ) बुधगांव (ता . मिरज ) येथील लोकशाहिर आण्णा भाऊ साठे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल नारायण आवळे यांना सोशलव्हॕल्यु सामाजिक संस्थेच्यावतीने मानवसेवा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे .                                                 सुनिल आवळे हे गेली अनेक वर्षे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बेघर , गोरगरीब , मनोरुग्न अशा लोकांची अहोरात्र अखंडीतपणे सेवा करीत आहेत . तसेच त्यांनी आजपर्यंत कोणत्याही दानशूर व्यक्ती किंवा ट्रस्टच्या माध्यमातून मदत न घेता ते स्वतःच्या कष्टाने कमवलेल्या दामातून अशा गोरगरीबांची सेवा म्हणजे एक पुण्याईचे काम आहे . यावरून मानसातली माणूसकीचा दानधर्म व पुण्याईचे काम सुनिल आवळे यांच्या रुपातून दिसून येते .            या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन सोशलव्हॕल्यु सामाजिक संस्थेच्यावतीने सुनिल नारायण आवळे यांना मानवसेवा पुरस्कार जाहिर करण्यात आला .         
         सदर पुरस्कार मंगळवार दि .  १२ सप्टेंबर २०२३ रोजी  बालगर्धवं नाट्यगृह मिरज येथे  सांगलीचे जिल्हाधिकारी  राजा दयानिधी ,  पोलिस प्रमुख डाॅ ,बसवराज तेली ,  डाॅ ,संजय कलकुटगी वैधकियअधिक्षक रत्नागीरी  , डाॅ . अमित लवेकर मनोविकार तज्ञ रत्नागीरी ,  सुनिल पवार ,  आयुक्त सांगली मिरज कुपवाड   महानगरपालिका , नितीन शिवदे मानोप्चारतज्ञ ठाणे यांच्या हस्ते वितरण सोहळा  सपन्नं होणार आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.