जालना घटनेच्या निषेधार्थ खोतवाडीत बंद, सकल मराठा समाजाचा निषेध फेरी

विशालक्रांती वृत्तसेवा खोतवाडी -
 अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ आज बुधुवार 6 सप्टेंबर रोजी खोतवाडी गाव बंद ठेवून निषेध फेरी काढण्यात आली.
खोतवाडी स्टॅंड चौकात प्रचंड मोठया प्रमाणात युवावर्ग व ग्रामस्थ जमले होते. यावेळी  सरपंच विशाल कुंभार, दत्ता स्वामी, माजी सरपंच संजय चोपडे, माजी उपसरपंच गजानन नलगे, बजरंग चोपडे, प्रमोद शिंदे, आनंद चोपडे,गणपत चोपडे, बाबू कराडकर, ग्रामपंचायत सदस्या मंगल मुसळे, अजय डुबल, करण खोत, वैभव पवार, उत्तम सासणे, उत्तम पाटील, दगडू खोत, सौरभ खोत, नजीर सुतार, शुभम कांबळे,यांचेसह सकल मराठा समाज खोतवाडी स्टँड चौकात एकवठला. त्यानंतर खोतवाडी स्टॅन्ड चौकातून संगमनगर, यड्राव फाटा, मार्गे भव्य रॅली काढून ग्रामपंचायत खोतवाडी येथे निषेध फेरीची सांगता करण्यात आली. यावेळी मराठा आंदोलकार्त्यांवर झालेल्या लाठी हल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. या बंदला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी गावातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे गावात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.