विजय लक्ष्मी को ऑफ क्रेडिट सोसायटीची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न
जनवाड - शितल कुडचे जनवाड चिककोडी तालुक्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजातील उपेक्षितांचे अंतरंग ओळखून त्यांना आर्थिक सहाय्य देऊन संस्थेचा व सामान्य जनतेचा विकास करणारी संस्था म्हणून नावलौकिक आलेली विजय लक्ष्मी को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड जनवाड या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा तारीख 21 9 2023 रोजी पांडुरंग मंदिरामध्ये अत्यंत खेळण्याच्या वातावरणामध्ये पार पडली
संस्थेचे अध्यक्ष श्री निंगाप्पा मुधाळे यांनी संस्थेच्या विकास व प्रगतीच्या कार्याचा आढावा घेतला संस्थेने आतापर्यंतचा आलेख सभासदांसमोर मांडला यावर्षी संस्थेला 42 लाख 41 हजार 133 रुपये इतका निव्वळ नफा झाला असून संस्थेकडे 13 कोटी पेक्षा अधिक ठेवी असून सभासद संख्या 1689 असल्याचे सांगितले त्याचबरोबर प्रत्येक वर्षी एडिट वर्ग अ, मध्ये असून संस्था प्रगतीकडे असल्याचे त्यांनी सांगितले
या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रारंभी श्री लक्ष्मी देवीचा व सद्गुरू च्या फोटो पूजन दादा घाठगे यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष श्री लिंगप्पा मुधाळे उपाध्यक्ष श्री स्वप्निल पाटील संचालक श्री सनातन मगदूम श्री नारायण हिरवे श्री पिरगोंडा चौगुले श्री दत्तात्रय मडिवाळ श्री सुभाष पाटील श्री विजय पवार श्री विजय हांडे श्रीकांत शाडगे श्री तिप्पण पुजारी श्री अरुण मिस्त्री संस्थेच्या संचालिका सौ सुनिता मगदूम सुमन खोत यांच्या उपस्थितीत करण्यात आला
त्याचबरोबर संस्थेने सामाजिक बांधिलकी ओळखून देश सेवेसाठी भारतीय सेनेमध्ये भरती झालेल्या युवकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेमध्ये व मेरिट मधील मुलामुलींचा देखील संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याच बरोबर मान्य वरांचा सत्कार करणेत आला सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य मॅनेजर श्री पुंडलिक खापरे यांनी केले तर आभार मुख्याधिकारी यांनी मांडले या सभेसाठी सर्व संचालक सभासद हितचिंतक सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या