सदलगा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे आमदार गणेशअण्णा हुक्केरी यांच्याकडून पाहणी.
सदलगा प्रतिनिधी - आण्णासाहेब कदम चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून काल विद्यमान आमदार सन्माननीय श्री गणेशअण्णा हुक्केरी व सदलगा शहरातील मराठा समाजाचे कार्यकर्ते यांनी पुतळ्याची पाहणी केली. पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून अंतिम इतर सजावटीचे काम बाकी आहे. पुतळ्याच्या कामाचा आढावा घेण्याचे हेतूने सन्माननीय आमदार साहेबांनी कोल्हापूर येथे भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती पुतळ्याचे अवलोकन केले. आणि पुतळा सुंदर झाला आहे असे सांगून मूर्तिकार संदीप पाटलांचे अभिनंदन केले.या सदिच्छा भेटी प्रसंगी सन्माननीय आमदार श्री गणेशअण्णा हुक्केरी, श्रीमंत नंदराजजी निंबाळकर देसाई ननदीकर सरकार, चिकोडी तालुका मराठा महासंघाचे पदाधिकारी सन्माननीय श्री बाळासाहेब पाटील, चिकोडीचे नगरसेवक श्री अनिल माने, सदलगा शहरातील मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते श्री मोहनरावजी शितोळे, सदलगा शहराचे गाव कामगार पाटील श्री गजानन पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री कुमार माने, सदलगा शहरातील जेष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम, मलिकवाड गावचे संभाजी पाटील, महादेव वडगावे, श्रीनिवास पाटील , कोगनोळीचे प्राध्यापक प्रकाश कदम, मराठा मंडळाचे कार्यकर्ते दर्शन जगताप, अनिल माने, जयदीप मयेकर ,शुभम साळुंखे, संतोष हवालदार, परसू साळुंखे, सुनील बागडी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या