खोतवाडी येथील तरूणाची रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या

विशालक्रांती वृत्तसेवा - खोतवाडी तालुका हातकणंगले येथील एक तरुण दुपारी अडीचच्या सुमारास आवाडे पार्क तारदाळ येथील रेल्वे बोगद्याजवळ एक्सप्रेस रेल्वे खाली उडी आत्महत्या केल्याची घटना घडली.                                       घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, खोतवाडी येथील ओंकार संभाजी खोत वय वर्ष 24 राहणार खोतवाडी हनुमान मंदिर जवळ हा आज सोमवार दुपारी अडीच वाजण्याचे सुमारास एक्सप्रेस रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केली ओंकार हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आत्महत्येने खोतवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ओंकार एका खाजगी शाळेत क्लार्क म्हणून नोकरी करत होता. याचे दोन वर्षांपासून एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. या प्रेमप्रकरणाच्या नैराश्येतुन  आत्महत्या केली असल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. अपघाताचे घटना समजतात हातकणंले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून ओंकार चा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. सदर घटनास्थळी खोतवाडी तासगाव परिसरातील नागरिकांनी घटना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या घटनेचे अधिक तपास हातकणंगले पोलीस करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.