श्री लक्ष्मी विविध उद्देश प्राथमिक कृषी सहकारी संघाची 13 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी संपन्न.
जनवाड ता, चिककोडी येथील श्री लक्ष्मी विविध उद्देश प्राथमिक कृषी संघाची 13 वी वार्षिक सभा पांडुरंग मंदिरात पार पडली प्रथम मान्यवरांचे हस्ते लक्ष्मी देवीचे फोटो पूजन व संघाचे संस्थापक माननीय अण्णासाहेब चौगुले यांच्या फोटोचे पूजन झाले तसेच या सभेचे अध्यक्ष डॉ अप्पासाहेब घाठगे व प्रमुख मान्यवर सदलग्याचे माजी नगरसेवक पिरगोंडा पाटील. कल्लाप्पांना पडलीहाले. बाळकृष्ण पाटील. कृष्ण गोंडा पाटील. धोंडीराम पाटील. रामचंद्र चौगुले. सदाशिव पाटील. व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली
विना संस्कार नाही उद्धार या तत्त्वावरती संघाने आपली कर्तव्यनिष्ठा आणि परिश्रम यांच्या जोरावर सभासदांचा विश्वास संपादन करून संघ यशस्वी वाटचाल करीत असल्याचे मत संघाचे अध्यक्ष श्री रामचंद्र चौगुले यांनी मांडले ते पुढे म्हणाले आजतागायत संघाची सभासद संख्या 315 इतके असून दोन कोटी 78 लाख 83 हजार इतकी ठेव असून शून्य टक्के दराने 122 सभासदांना 87 लाख 75 हजार इतके कर्ज वाटप करण्यात आले आहे तसेच इतर कर्ज 1 कोटी 82 लाख 45 हजार कर्ज वाटप केले असून अहवाल सालात संघाला 4 लाख 56 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचे मत संघाचे अध्यक्ष रामचंद्र चौगुले यांनी सांगितले त्याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कती आमदार प्रकाश हुक्केरी आमदार गणेश हुक्केरी माजी आमदार महांतेश कवटगी मठ यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर गावातील देश सेवेसाठी सैन्य भरती झालेल्या युवकांचा सत्कार संघाच्या वतीने करण्यात आला तसेच
संघाचे मुख्य कार्यदर्शी चिदानंद होळके यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन केले लेमन मुदाळे सर यांनी सर्वांचे स्वागत केले त्याचबरोबर अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर आप्पासाहेब घाटगे यांनी आपले मनोगत मधून संघाचा आढावा घेतला व आर्थिक प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे ते सांगितले या कार्यक्रमासाठी लक्ष्मी विविध उद्देश प्राथमिक कृषी सहकारी संघाचे अध्यक्ष रामचंद्र चौगुले उपाध्यक्ष सदाशिव पाटील संचालक लक्ष्मण मगदूम कृष्ण गोंडा पाटील सौ अंजना मगदूम श्रीमती सुमन घाटगे श्रीमती कृष्णाबाई मगदूम गौतम शिंगे शिवानंद तेलसंग त्याचबरोबर प्रभाकर केरुरे धोंडीराम पाटील बाळकृष्ण पाटील डॉक्टर रमेश चौगुले पिरगोंडा चौगुले भिमा चौगुले स्वप्निल पाटील निंगाप्पा मुधाळे सनातन मगदूम श्रीकांत शेंडगे राहुल घाडगे यांच्यासह शेतकरी सर्व सभासद संघाचे कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी संघाचे उपाध्यक्ष सदाशिव पाटील यांनी सर्वांचे आभार मानले
टिप्पण्या