सेलू ते निपाणी टाकळी रस्ता लवकरात लवकर पूर्ण करणार. माजी आमदार विजय भांबळे यांचे आश्वासन.
सेलू : दि. 25 सप्टे रोजी सेलू जिंतूर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे लोकप्रिय आमदार विजय भांबळे यांच्या निवासस्थानी दैनिक अधिकारनामा चे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन तालुक्यातील विकास कामा संदर्भात अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काय काय उपाय योजना करता येतील, तालुक्यातील अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये एम.आय.डी सी. चा प्रकल्प, ग्रामीण भागातील आरोग्यां च्या, पाणी पुरवठा योजनांचा,रस्ते आदी प्रश्नांवर सर्वांगिण विकासासाठी पुढाकार घेऊन जनतेचे प्रश्न तातडीने सोडावेत अश्या संदर्भात सकारात्मक पाऊले उचलून तालुक्याचा विकास कसा करता येईल याकडे लक्ष वेधले असता त्यांनी अनेक प्रश्न सोडविण्यासाठी सेलू जिंतूर मतदार संघांसाठी निधीची तरतूद उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी आपल्या मतदार संघात सत्ताधारी आमदार असून ही त्यांनी मतदार संघांसाठी निधी उपलब्ध करून घेतला नाही हे त्यांचे अपयश असून तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत त्यांची उदासीनता दिसून येते.गेल्या 10 वर्षांपासून परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तीन तीन संचालक असून सुद्धा व सत्ताधारी आमदार असून सुद्धा त्याच बरोबर तालुक्यातील बहुतांश सोसायटीवर प्रभुत्व असून सुद्धा शेतकऱ्यांना पिक कर्ज उपलब्ध करून दिले नाही.इतर तालुक्यात सरसगट शेतकऱ्यांना सोसायटी मार्फत एक ते दीड लाख पर्यंत कर्ज वाटप करण्यात आले आहे. परंतु सेलू जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना एक रुपयांचे सुद्धा कर्ज वाटप झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी सत्ताधारी आमदार असल्याचा फायदा होईल या हेतूने सोसायटी मतदान केले परंतु त्यांचा भ्रम निरास झाला.आज पर्यंत शेतकऱ्याला एक छद्दाम मिळाला नाही हे खेदाने म्हणावेसे वाटते. सेलू ते निपाणी टाकळी हा तीन किलो मिटर चा रस्ता गेले अनेक वर्षांपासून कधीच पूर्ण झाला नाही या रस्त्यावर अनेक खेडी जोडली आहेत. सेलू ते निपाणी टाकळी या रस्ते कामात संबंधित कंत्राटदाराने गुणवत्तेबाबत अक्षरशः हलगर्जीपणा करीत निकृष्ट दर्जाचे मोठ्या प्रमाणावर काम केले असून त्यामुळे तो रस्ता आजही वाहतूकीस योग्य झाला नाही,सेलू ते निपाणी टाकळी या रस्त्याच्या कामाकरीता राज्य सरकारने 49 लाख मंजूर केले. त्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जिंतूर उपविभागा- मार्फत काम सुरु करण्यात आले. या कामास जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे 24 ऑक्टोंबर 2021 रोजी प्रशासकीय मान्यता आहे. परंतु, संबंधित कंत्राटदाराने या रस्त्याचे काम अक्षरशः थातूर-मातूर पध्दतीने करीत बिले उकळली आहेत. त्यामुळे रस्ता आजही जैसे थे अवस्थेत आला असून या रस्ते कामात कोणतीही गुणवत्ता राखली गेली नाही, त्यामुळे या मार्गावरील ग्रामस्थांच्या व्यथा आजही कायम आहेत.
या प्रकरणात संबंधित ठेकेदाराविरोधात चौकशी करीत कठोर कारवाई करावी, ठेकेदारास मंजूरी नुसार पुन्हा काम करण्यास सांगावे, अशी मागणी सुद्धा केली असता रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सेलू बाजार समितीचे उपाध्यक्ष प्रकाश मुळे,बोरगावचे सरपंच,बाळासाहेब बोचरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या