टाकळीवाडी येथे प्रत्येक पौर्णिमेला बौद्ध वंदना हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात होत आहे साजरा..

 


टाकळीवाडी - नामदेव निर्मळे दि.1, 

टाकळीवाडी तालुका शिरोळ येथे बौद्ध समाजाने ५/५/२०२३ रोजी पासून बौद्ध विहार मध्ये बौद्ध वंदना कार्यक्रम प्रत्येक दर रविवारी व पौर्णिमेला आयोजित करण्यात येत आहे.

   बौद्ध समाजाने हा घेतलेला कार्यक्रमाचे गावामध्ये कौतुक होत आहे. बौद्ध विचार सर्वांच्या पर्यंत पोहोचावे.

   बुद्ध वंदना केली जाते. चांगले विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम चालू आहे.

तसेच प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केले जाते.

   सुलाबाई राजाराम कांबळे वय 85 यांनी या वयात सुद्धा बौद्ध शिकवण आत्मसात केलेली आहे.

  यावेळी बौद्ध उपवासक, उपवासिका मोठ्या संख्येने उपस्थित असतात. बौद्ध विचार आचरणात आणण्याचे काम चालू आहे.

  महाप्रसादाचे मानकरी विलास राजाराम बळी, सुवर्णा दगडू कांबळे रा.भातनांगणुर, अक्काताई दिलीप कांबळे रा. हेरवाड यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी समस्त बौद्ध समाज उपस्थितीत होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.