सोमवारी मनोज जरांगे यांचे परभणीत आगमन; मराठा आरक्षण.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

उद्या जिंतूर मध्ये जाहीर सभा.

परभणी : दि.29 मराठा  समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटलांनी उपोसणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातून एक लढा उभारला असून मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी तब्बल 17 दिवस उपोषण करून राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत आरक्षण दिले नाही तर पुढील दिशा काय असेल यासाठी मराठवाडा दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्त  जालना दौरा संपवून  उद्या परभणी जिल्हा तील जिंतूर शहरात जाहीर सभेचे आयोजन शनिवारी (दि.30) दुपारी 4 वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात  सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या सभेला मराठा समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सरटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी तब्बल 17 दिवस उपोषण केले होते. याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण देण्यासाठी चाळीस दिवसाचा वेळ मागून घेतला होता, म्हणून उपोषण सोडून त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन चालू ठेवले होते. दरम्यान, राज्य सरकारने मागितलेला चाळीस दिवसाचा वेळ 14 ऑक्टोबर रोजी संपत आहे म्हणून दिलेल्या मुदतीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले नाही तर पुढील दिशा काय असेल यासाठी संवाद दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. याच दौर्‍यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात जाऊन समजातील सर्व मराठा बांधवाशी सभा,बैठका,चर्चा सत्रे आयोजित करून पुढील कार्यक्रमांची रूपरेषा काय असेल याबाबत सुसवांद  साधणार असून 2 ऑक्टोंबर  रोजी परभणीत त्यांचे आगमन होणार आहे. त्या अनुसंगाने सकल मराठा  समाजाने सावली विश्राम गृहावर बैठकीचे आयोजन करण्यात आले.बैठकीत जरांगे पाटील यांचे झिरो फाट्यापासून प्रत्येक खेडया च्या पाटीवर जंगी स्वागत करण्याचे ठरवले आहे. तसेच माँ साहेब जिजाऊ मंदिरात त्यांचे भव्य दिव्य स्वागत समारंभ सोहळा साजरा करण्याचे ठरवले आहे. या स्वागत संभारंभा नंतर ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.तसेंच माँ जिजाऊ मंदिरा पासून  ते खानापूर फाटा येथील श्रीकृष्ण गार्डन पर्यंत मोटारसायकल रॅली काढली जाणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता महा यल्गार सभा होणार आहे. त्यानंतर ते पाथरी येथे सकल मराठा बांधावाशी  चर्चा करून  सभा घेऊन मार्गदर्शन करणार आहेत.त्यानंतर ते माजलगाव मार्ग बीड जिल्ह्यात जाणार आहेत या सभेसाठी जिल्हातील 52 खेड्यातील  मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.