व्यवस्थापन समितीकडून शिक्षक दिनी केला शिक्षक व मान्यवरांचा सत्कार

शिरोळ तालुका प्रतिनिधी - रमेशकुमार मिठारे.
      मजरेवाडी परिसरातील केंद्रीय शाळा,आर.के.नगर,वडर  वसाहत व सर्व अंगणवाडीच्या शिक्षक, शिक्षिका,सेवक, मदतनीस, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा शिक्षक दिनी संयुक्तिक सत्कार कार्यक्रम केंद्र शाळा मजरेवाडी येथे दिमाखात पार पडला.या कार्यक्रमास मजरेवाडी केंद्राचे केंद्र प्रमुख जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती.केंद्रप्रमुख- जाधवर म्हणाले की असा उपक्रम आता पर्यंत कोणी ही असा सत्कार केलेला नाही तुमच्या शाळा व्यवस्थापन समितीने आमचा केलेला हा सन्मान राष्ट्रपती कडून जो सन्मान मिळतो त्याही पेक्षा मोठा सन्मान झाला एवढं मोठ काम केलात त्याबद्दल त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती मजरेवाडी यांचे आभार व्यक्त केले.यावेळी मजरेवाडी गावचे शिक्षक स्वर्गीय धनंजय पट्टणकुडे यांच्या वारसांना एक हात मदतीचा या आव्हानाला प्रतीसाद देऊन कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वर्गणीतून जमा झालेले एक लाख चवर्यानऊ हजार रक्कमेचा धनादेश .महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शिरोळ तालुकाध्यक्ष- संतोष जुगळे,शिक्षक भारतीचे पिराप्पा कागले व शिक्षक संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष - रवीकुमार पाटील, यांच्या हस्ते
 श्रीमती पट्टणकुडे यांच्याकडे सुपूर्द करणेत आला.यावेळी रवी पाटील यांनी आपल्या मनोगतातून स्वर्गीय धनंजय पट्टणकुडे यांच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला.
      कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वागत गीतेतून उपस्थितांचे मन हेरावून घेतले.यावेळी सरपंच-संगिता परिट, उपसरपंच-अंकिता चव्हाण, ग्रामसेवक-वैरागे, सदस्य-सुनिता कोटे,अरुणा खुरपे,किशोर जुगळे, महेश नरूटे, पोलिस पाटील-वंदना दतवाडे,शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष-युगंधरा ढोणे, सदस्य-रेवती पट्टेकरी,सागर धोतरे, दत्ता कोकणे,माजी सरपंच- नंदकिशोर पाटील, दिनकर नरुटे,महावीर हिरुकुडे, आण्णासाहेब कागले,सुरेश गवंडी,अमोल कागले,ओंकार पिंपळे व पालकवर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत व प्रस्तावना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.महेश पट्टेकरी  यांनी केले.संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोरे सर व नयना गुरव मॅडम यांनी केले तर आभार शांतीनाथ कोटे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.