खोतवाडीत चार जणांना डेंगूची लागण आरोग्य विभागाची माहिती,ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेचा बोजवारा.
विशालक्रांती वृत्तसेवा -
खोतवाडी मध्ये चार जणांना डेंगूची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाचे एस एम कोकणे यांनी खोतवाडी ग्रामपंचायत ला लेखी माहिती दिली. सत्य नगर -1, खोतवाडी हायस्कूल जवळ - 1 माने मळा येथे 2 असे एकूण चार डेंगुचे मिळून आल्याने खोतवाडी गावात खळबळ उडाली आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात डेंगूचे चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून गावातील गटारी व परिसर स्वच्छ तसेच धुर फवारणी तन नाशक औषधे मारून गावातील परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. ग्रामपंचायत कडून गावातील गटारीची स्वच्छता, औषध फवारणी, तन नाशक फवारणी, करणे आदी गोष्टींचे गांभीर्य नसल्यामुळे गावातील जनतेला साथीच्या रोगांना बळी पडावे लागत असून ग्रामपंचायतच्या कारभारावर खोतवाडी नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीकडून ठोस उपाययोजना करण्याची गरज असताना ग्रामपंचायत प्रशासन मात्र गावातील गटारींची स्वच्छता, औषध फवारणी, डास प्रतिबंधक धुर फवारणी व भागातील कचरा उठाव आधी गोष्टींकडे दुर्लक्ष करून जनतेच्या मात्र जीवाशी खेळ करून साथीच्या रोगांना एक प्रकारे चालना देण्याचे कामच करीत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. खोतवाडी ग्रामपंचायत दोन सदस्यांच्या घरातच डेंगूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले तरीही प्रभागातील लोकप्रतिनिधींचे स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष करत जनतेच्या जिवाशी खेळ चालवला असल्याचे बोलले जात आहे. जे लोकप्रतिनिधी आपल्या घरच्यांचा साथीच्या आजारापासून बचाव करू शकत नाहीत हे जनतेचा साथीचे आजारापासून बचाव करणार काय करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
टिप्पण्या