संस्थाचालक व शिक्षक संघटनांची उद्या महत्वपूर्ण बैठक2 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान शैक्षणिक संघर्ष सप्ताह.
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
परभणी :दि. 26 सप्टेंबर रोजी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यां च्या कंत्राटी भरतीचा व 21 सप्टेंबर रोजी शाळा दत्तक योजने संदर्भात राज्य सरकारने घेतले ल्या निर्णयाच्या निषेधार्थ 2 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान शिक्षण संस्था महामंडळाने जिल्हा स्थानासह संपूर्ण जिल्ह्यात आयोजित केलेल्या शैक्षणिक संघर्ष सप्ताहा निमित्ता ने 27 सप्टेंबर रोजी सर्व शिक्षण संस्था चालक, मुख्याध्यापक संघ, शिक्षक व शिक्षके त्तर कर्मचारी संघटना व विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकार्यांनी व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे.
जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयाच्या सभागृहात बुधवार 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केलेल्या या बैठकीतून 2 ते 7 ऑक्टोंबर या दरम्यानच्या शैक्षणिक संघर्ष सप्ताहा संदर्भात विचार विनिमय करीत पूर्णतः नियोजन केले जाणार आहे. तसेच राज्य सरकारने कंत्राटी भरतीसह शाळा दत्तक योजने संदर्भात घेतलेल्या शिक्षण विरोधी धोरणांबाबत पुढील आंदोलनाच्या दिशाही ठरविण्यात येणार आहेत.
यासाठी आयोजित केलेल्या बैठकीस सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना व विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकार्यांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह तथा माजी आमदार अॅड.विजय गव्हाणे, कार्यवाह रामकिशन रौंदळे, जिल्हा शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष संतोष धारासूरकर, उपाध्यक्ष सूर्यकांत हाके, जिल्हा कार्याध्यक्ष उदयराव देशमुख, सचिव बळवंतराव खळीकर, महामंडळाचे महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक नावंदर, जिंतूर तालुका- गोविंदराव लहाने, रामराव उबाळे, सेलू तालुका- राजेंद्र लहाने, डॉ. विनायक राव कोठेकर, डॉ. संजय रोडगे, रहिम खान पठाण, पाथरी- तालुका अनिलराव नखाते, मानवत तालुका- बालकिशन चांडक, अॅड. मुंजाजी भाले पाटील, सोनपेठ-नवनाथ मुजमुले, शिवाजीराव मोहाळे, लक्ष्मीकांत देशमुख, गंगाखेड तालुका- कृष्णा दळणर, रामराव फड, वाघमारे, पालम तालुका- तुषार दुधाटे, गणेशराव रोकडे, पूर्णा तालुका-चंद्रकांतराव चापके, दिलीपराव माने, परभणी तालुका- नितीन लोहट, संजय मुंडे तसेच जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाचे अध्यक्ष राजू शिंदे, देविदासराव उमाटे, बालासाहेब भांगे, शिवाजीराव पाचकोर, देवानंद आंभोरे, दिगंबरराव मोरे, प्रकाश हारगावकर, संतोष गायकवाड, यशवंत मकरंद, निशिकांत हाके, विठ्ठलराव कांगणे, रणजित काकडे, मामा सुर्वे, उत्तमराव केंद्रे, अनिल मैड, बाळासाहेब राके, प्रा. घोडके, प्रा. अरुणकुमार लेमाडे, निसार पटेल यांसह अन्य पदाधिकार्यांनी केले आहे.
टिप्पण्या