पट्टण कोडोली येथे अंगणवाडी क्र.165 मध्ये पोषण माह समारंभ साजरा

 पट्टणकोडोली वार्ताहर -


पट्टण कोडोली बिरोबा माळ येथे अहिल्या बाल विकास सेवा केंद्र अंगणवाडी क्र.165 मध्ये पोषण माह समारंभ साजरा करण्यात आला 1/9/2023 ते 30/9/2023 पर्यंत पोषण माह समारंभ साजरा करण्यात येणार आहे भारत देश कुपोषित मुक्त व्हावा यासाठी गरोदर , स्तनदा ,किशोरी मुली 0 ते 6 वयोगटातील बालके यांच्या मध्ये जन जागृती करण्यासाठी ह्या पोषण माह चे आयोजन केले जाते आज अंगणवाडी क्र 165 मध्ये सर्व लाभार्थी तसेच अंगणवाडी सेविका ज्योती सावंत , सविता चव्हान ,मदत निस अश्विनी पोवार , मुक्ता रांगोळे ,यांचे सहकार्य लाभले ह्या मध्ये लहान मुलांचे वजन उंची मापण्यात आली पर्यवेक्षिका नीलम पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच येथून पुढे होणारे कार्यक्रम यांचे पण नियोजन करण्यात आले ह्या मध्ये पाककृती स्पर्धा, सुधरुढ बालक स्पर्धा , रांगोळी स्पर्धा ,पोषण बालक स्पर्धा अश्या अनेक स्पर्धा येथुन पुढे घेण्यात येणार असल्याचे अंगणवाडी सेविका ज्योती सावंत यांनी सांगितले सदर कार्यक्रमास सर्व पालकांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.