स्वर्णीम युवा मंडळ अकिवाट यांच्या वतीने आयोजित केलेल्या ऐतिहासिक नानी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

अकिवाट :- रमेशकुमार मिठारे


             अकिवाट (ता.शिरोळ) येथील स्वर्णिम युवा मंडळ नेहमीच नवनवीन सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक उपक्रमात आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. गणेशोत्सवाच्या अवास्तव खर्चास फाटा देत मंडळाने सुळकुड येथील ऐतिहासिक नानी संग्रहक  शेखर कोणे यांच्या सहकार्याने ऐतिहासिक नानी प्रदर्शन येथील ग्रामपंचायत सभागृहात 22सप्टेंबर रोजी भरविण्यात आले होते.या प्रदर्शनात, परदेशी इंग्लंड, अमेरीका, भारतामधील गंधार, तक्षशीला राजवटीच्या काळापासून ते अलिकडच्या चिकोडी, बेळगाव, निपाणी,कागल,कापसी,पन्हाळा व अनुषंगिक प्रांतातील नाणी पहावयास मिळाल्याने प्रदर्शनास भेट देणार्यांचा चेहरा फुलला होता.या प्रदर्शनात बाल-चिमुकले पासुन ते वृद्धानी भेट देऊन वयस्कारानी आपल्या काळी चलनात असलेल्या नोटा व नाणी बाबत इतरांना माहीती देत होते.ऐतीहासीक नाणी जपणुक करुन शेखर कोणे विनामोबदला सामाजिक कार्य करत असलेबद्दल मंडळाकडून शाल-श्रीफळ व अभिनंदन पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोणे यांनी लहानपणापासूनच ऐतीहासीक नानी जपून ठेवणेचा माझा छंद असून मी त्याची प्रदर्शनातून लोकांना माहिती देत असतो.याच प्रमाणे सध्या स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी मी जनजागृती करत आहे यासाठी समाजातील जाणकारांनी  स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी ठोस निर्णय घेऊन स्त्री भ्रूणहत्या रोखणेचे आवाहनही त्यांनी केले.
प्रदर्शनाचे उदघाटन उपसरपंच -प्रकाश रायनाडे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य -शितल हळिंगळे,अनिल वळवाडे (सावकार) अमोल माने, पोलीस पाटील -सचिन कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष -राजेंद्र चौगुले, जेष्ठ पत्रकार-गणपती कागे,स्वर्णीमचे अध्यक्ष-विजय पिंपळे, विकास वळवाडे, सुरज सुतार, संदीप निटवे  व मंडळाचे  कार्यकर्तेसह बहुसंख्य नागरिक उपस्थित राहून ऐतिहासिक नानी प्रदर्शनाचा लाभ घेतला.प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत अकिवाट,बुरजा खालचा राजा मंडळाचे कार्यकर्ते व विशेष सहकार्य संदिप फराळे यांचे लाभले.कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक राहुल सुतार यांनी केले तर आभार रमेशकुमार मिठारे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.