ननदी येथील श्री हाल सिद्धनाथ मल्टी परपज सोसायटीला दोन लाखाच्या वर नफा
चिकोडी तालुक्यातील ननदी येथील श्री हाल सिद्धनाथ मल्टीपर्पज सोसायटी या संस्थेस सन 2022 23 सालात दोन लाख 40 हजार इतका निवल नफा झाल्याचे माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री संपतराव थोरात यांनी तेराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी बोलताना सांगितले कार्यक्रमाची सुरुवात श्री हाल सिद्धनाथांच्या फोटोची पूजन व दीप प्रजलांनी करण्यात आली प्रमुख पाहुणे गुरुदत्त शुगरचे संचालक श्री बाळासाहेब पाटील व श्री बबनराव चौगुले हे होते 2022 23 सालातील अहवाल वाचन संस्थेच्या सेक्रेटरी सौ सुप्रिया सुळे यांनी केले यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर भारतीय सेना दलामध्ये निवड झाल्याबद्दल शाफिउल्ल नाईकवाडी व श्रीधर सूर्यवंशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला अहवाल वाचताना संस्थेच्या सेक्रेटरी म्हणाल्या की अहवाल सालात संस्थेकडे 277 इतके सभासद असून रिझर्व फंड 9 लाख 23 हजार इतका आहे तर संस्थेकडे एकूण डिपॉझिट दोन कोटी 37 लाख 97 हजार 476 इतकी असून निव्वळ नफा दोन लाख 48 हजार इतका झाल्याचे त्या सांगितल्या कार्यक्रमात सुरुवातीला संस्थेचे संचालक श्री मल्लू हवालदार यांनी प्रास्ताविक केले तर स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष अण्णा चिनगे यांनी केले अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष श्री संपतराव थोरात यांनी संस्थेमध्ये सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली तसेच संस्थेच्या स्वतःच्या इमारतीसाठी जागे ची तरतूद झाल्यावर लवकरच संस्थेची स्वतःची इमारत बांधण्याची सभासदांना ग्वाही दिली त्यावेळी अध्यक्ष म्हणाले की या वर्षापासून संस्थेने हालसिद्धनाथ सुकन्या समृद्धी योजना सुरू केली असून या योजनेद्वारे मुलींसाठी 21 व्या वर्षी ठेवीच्या आठ पट रक्कम मिळणार आहे तरी सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती केली
यावेळी संस्थेचे संचालक श्री सिदबिर पुजारी शिवाजी मरडे नाईक सर दुडाप्पा सुळे बाबू मुल्ला अनिल धर्मोजे महादेव पाटील सौ मोनिका शहा सविता सूर्यवंशी तसेच सदाशिव धर्मोजे दतवाडचे श्री लक्ष्मी पत संस्थेचे संचालक महादेव पवार माजी नंनदी ग्राम पंचायत अध्यक्ष मधुकर कोकणे आनंदराव सूर्यवंशी नागेश सुळे आबासाहेब काटे यशवंत शिंदे राकेश डवरी नारायण गवंडी राजेंद्र पाटील मलिकवाड निवास पाटील धनाजीराव पाटील राजू चव्हाण पापू जाधव मारुती हवलदार उदय सूर्यवंशी राजू फुटाणे रामचंद्र मडिवाळे विजय शहा इत्यादी मान्यवरासह सभासद ठेवीदार हितचिंतक उपस्थित होते सूत्रसंचालन कन्नड शाळेचे शिक्षक मोहन पाटील सर यांनी केले तर आभार संस्थेचे संचालक श्री नाईक सर यांनी मांडले .विशालक्रांती वृत्तसेवा नणदी.
टिप्पण्या