सदलगा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्राला तवनक्के कुटुंबीयांकडून ऑक्सिजन कॉन्स्टंट मशीन ची भेट.

सदलगा प्रतिनिधी - चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राला सदलगा शहरातील कै. तिप्पांन्ना रामू तवनक्के यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पत्नी श्रीमती कलावती तवनक्के आणि राजू बस्तवाडे यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना प्राणवायू मिळावा या उद्देशाने ऑक्सिजन कॉन्स्टंट मशीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी श्री मल्लिकार्जुन पोगत्यानहट्टी यांच्याकडे समारंभपूर्वक काल देण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक श्री राजू अमृत संम्मनावर यांनी आपल्या मनोगतात म्हणाले तवनक्के कुटुंबीयांनी केलेली ही मदत अनेक रुग्णांना आरोग्य केंद्रातील संजीवनी ठरणारी आहे कारण कोरोना महामारीच्या काळातील प्राणवायूच्या गरजेची बाब लक्षात घेऊन गरीब गरजूंना याचा लाभ व्हावा या उद्देशाने केलेले हे मदतीचे कार्य कौतुकास्पद आहे, असे म्हणाले. या कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती कलावती तवनक्के, राजकुमार बस्तवडे, संतोष भोजे ,वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मल्लिकार्जुन पोगत्यानहट्टी,अर्चना बस्तवडे, ऋतुजा बस्तवडे, वृषभ तवनक्के, राजू अमृतसंमनावर ,आदित्य अज्जनावर, आरोग्य केंद्राचे सहाय्यक कुमार नाईक, सुहासिनी सोमापूर ,पल्लवी देशमाने, रमेश पाटील, अनिल राजपूत, सेविका संगीता निंबाळकर, विजया नवले, शशिकला अनुरे, संगीता पाटील इत्यादी आशा कार्यकर्त्यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.