देवदर्शनाला जाणार्‍या सदलगायेथील भाऊबहीणीवर काळाचा घाला मलिकवाड नणदी रस्त्यावर झाला अपघात



विशालक्रांती वृत्तसेवा - मलिकवाड.

सदलगा येथील भाऊबहीणीवर देवदर्शनासाठी चिक्कोडीकडे जाताना मलिकवाड नणदी रस्त्यावरील शर्यतीमाळाजवळ नेक्सा बलेनोने ॲक्टिवाला समोरासमोर धडक दिल्याने भाऊबहीणीचा जागेवरच अंत झाला. घटनास्थळावरील माहितीनुसार सदलग्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्रशांत नागराज तुळशीकट्टी (वय २० वर्षे) आणि त्याची बहिण प्रियांका नागराज तुळशीकट्टी (वय  १९वर्षे) हे दोघे होंडा ॲक्टिवा ( KA23 EM3637) वरुन चिकोडीला परटी नागाप्पाच्या दर्शनासाठी जात होते. त्याचवेळी समोरुन मलिकवाड येथील दादासाहेब कोळी (वय ६० वर्षे)  त्यांच्या मुलग्यासह नेक्सा बलेनो मधून नविन    चारचाकी गाडी (T0823GA4818A) मधून गोव्यातून येत असताना समोरासमोर धडक होऊन ॲक्टिवासह भाऊबहीण उडून बाजूला फेकले गेल्याचे चित्र दिसते. सदलग्यातील हेस्कॉम कंत्राटदार नागराज तुळशीकट्टी यांची दोन्ही मुले प्रशांत आणि प्रियांका तुळशीकट्टी या भाऊबहीणीच्या वर्मी दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील दोन्ही प्रवाशांना एअरबॅगमुळे दुखापत झाली नाही. कारच्या उजव्या बाजूचा चुराडा झाला तर ॲक्टिवाचा चक्का चूर झाला आहे.

सदलगा पोलिस ठाण्याच्या बाहेर प्रशांत प्रियांकाच्या आईवडिलांनी दु:खावेगाने हंबरडा फोडला. मृत तुळशीकट्टी भाऊबहिणीचे  नातेवाईक, शेजारी आणि मित्रपरिवार तसेच नागराज तुळशीकट्टीचे सहकारी यांनी सदलगा पोलिस ठाण्याच्या बाहेर गर्दी केली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.