मलिकवाड येथे प्रतिभा कारंजी स्पर्धा उत्साहात तालुक्यातील नऊ शाळांचा सहभाग
मलिकवाड, एकसंबा सीआरसी पातळीवरील सरकारी प्राथमिक अनुदानित विनाअनुदानित तालुक्यातील नऊ शाळेंच्या प्रतिभा कारंजी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपंचायत अध्यक्षा अनिता इंगळे, उपाध्यक्ष संभाजी पाटील, शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम श्री सरस्वती प्रतिमेचे पूजन केले. त्यांनतर दीपप्रज्वलन करून ढोल वाद्य वाजवून स्पर्धेचा शुभारंभ झाला. सीआरपी विभागप्रमुख एस.एम. माने यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमास सुरुवात झाली.
यावेळी उपाध्यक्ष संभाजी पाटील बोलताना म्हणाले, सरकारी शाळेत सरकारकडून मुलांना विविध प्रकारच्या सोयी उपलब्ध केल्या आहेत. दूध,अंडी, देशी केळी,चिक्की, बूट, सॉक्स, गणवेश यासह, इतर सुविधा दिले जातात. त्याचबरोबर या शाळेतून अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्च पदावर सेवा बजावत असून मराठी, कन्नड व हायस्कूल शाळेसाठी कोणतेही सहकार्य लागल्यास ग्रामपंचायतीकडून त्या पुरविल्या जातील. पालकांनी सरकारी शाळेत घालून मुलांची संख्या वाढविण्यास सहकार्य करावे असे सांगितले. यावेळी शिक्षक व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, हार घालून सत्कार केला. प्रतिभा कारंजी स्पर्धेसाठी तालुक्यातील मलिकवाड, नणदी, नणदीवाडी, उळागड्डीवाडी, एकसंबा, करोशी, चिक्कोडी येथील गांधी मार्केट, इंदिरा नगर शाळेतील विद्यार्थी स्पर्धेत भाग घेतले होते.
यावेळी अध्यक्षा अनिता इंगळे, उपाध्यक्ष संभाजी पाटील, हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.आर.माने, मराठी शाळेचे मुख्याध्यापक अजित माने, एन.व्ही. पाटील, एस. एन. निवलगी, एम. बी. केरुरे, शिरीष माने, बी. एल. बेदरकर, बागवान, दिनकर, जमादार, मायन्नावर, राजू ठोंबरे, नदाफ, हट्टीयावर, बागवान, सिडलाळे, धर्मोजे, लोखंडे, खैरमोडे, लोकरे यांच्यासह, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षिका मीनाक्षी ढवळे यांनी सूत्रसंचालन केले. तर एस.बी. चौगुले यांनी आभार मानले.
टिप्पण्या