खेळातुनच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभते. जयप्रकाशजी बिहाणी

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.


तालुका मैदानी क्रीडा स्पर्धेला 432 खेळाडूं चा उदंड प्रतिसाद.


सेलू : सुदृढ शरीरातच सुदृढ मन व  बुद्धी चा विकास होत असतो. मैदानावरील खेळातुन च हे साध्य होऊ शकते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्राप्त करण्यासाठी मैदानी खेळ खेळावे असे आवाहन नूतन शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री जयप्रकाशजी बिहाणी यांनी केले. क्रीडा व युवक सेवा संचालना लय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा धिकारी कार्यालय परभणी, गटशिक्षणा धिकारी कार्यालय पं.स.सेलू व नूतन महाविद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी आयोजित तालुका स्तरीय शालेय मैदानी स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय जातपडताळणी अधिकारी गोरख राठोड, प्राचार्य गणेश सोळंके, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.के. के. कदम,प्रा नागेश कान्हेकर,सतीश नावाडे, तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक  गणेश माळवे, सुत्र संचालन सुभाष मोहकरे, तर राजेश राठोड यांनी आभार मानले.परभणी एपी आय रामेश्वर तुरनर, प्रशांत नाईक यांनी स्पर्धेस  भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सेलू तालुक्या तील मैदानी क्रीडा स्पर्धेत १००, २००, ४००, ६००, ८०० मी. धावणे,४×१००, ४×४०० रिले रेस , गोळा, भाला, थाळी फेक, लांब,उंचउडी, या स्पर्धेत ४३२ खेळाडूंचा उदंड प्रतिसाद मिळाला.स्पर्धेस पंच म्हणून प्रशांत नाईक,कैलास टेहरे,  संभाजी बादाड, अमोल नंद, हनुमान नरवाडे, निलेश सोळंके, राजेश राठोड, संजय भुमकर, सुरज शिंदे, संतोष शिंदे, अमर सुरवसे, दिपक जोरगेवार, वेदांत बोचरे, बबलु घांडगे, सिध्देश्वर गवळी, ज्ञानदीप घांडगे, यांनी काम पाहिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.