खोतवाडी येथील इसमाची रेल्वे खाली आत्महत्या, या आठवड्यातील रेल्वे खाली आत्महत्येची दुसरी घटना

हातकणंगले वृत्तसेवा - खोतवाडी तालुका हातकणंगले येथील इसम शिवराम पुनाराम चौधरी वय  49 वर्षे राहणार हनुमान मंदीर जवळ खोतवाडी याने गुरूवार 28 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी बाराच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली.                                       अधिक माहिती अशी की, शिवराम चौधरी यंत्रमाग कामगार होता. शिवराम गेला महिनाभरापासुन दारू पिऊ लागला होता. गुरुवारी 28 रोजी आपली टुव्हिलर घराजवळ लावून खोतवाडीतून प्राथमिक आरोग्य केंद्र हातकणंगले चालत गेला होता. दवाखान्या जवळच असलेल्या रेल्वे रूळावर दारूच्या नशेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात त्याचे दोन्ही पाय तुटून डोकीला मार बसल्याने गंभीर जखमी झाला. सदर घटनेची माहिती  रेल्वे पोलिसांना मिळताच पोलासांनी घटना स्थळी धाव त्याला उपचारासाठी सिव्हिल हाॅस्पिटल मिरज येथे दाखल केले. मात्र गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरू असतानाच अखेर गुरूवारी रात्री 11: 00 वाजता त्याचा मृत्यु झाला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.त्याच्या पश्चात दोन मुले आहेत.एक होमगार्ड मधे सर्व्हिसला आहे. तर दुसरा डाॅक्टर कोर्स करत आहे. दोन वर्षापुर्वी आईचे निधन झाले होते. आता वडीलांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवल्याने दोन्ही मुलं मात्र आई वडीलां विना पोरकी झाल्याने गावातून हळहळ व्यक्त होत आहे. रक्षाविसर्जन रविवार दि. 1 आक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजता इचलकरंजी येथील मुक्ती धाम मधे आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.