कोरम पूर्ण नसताना गाव सभा घेण्यामागचे गौड बंगाल काय खोतवाडीकरांचा सवाल
विशालक्रांती वृत्तसेवा - हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतची 15 ऑगस्ट ची नियोजित गाव सभा 31 ऑगस्ट रोजी नुकतीच संपन्न झाली गाव सभा घेण्यासाठी गणपुर्तीची आवश्यकता असते एकूण मतदारांपैकी किमान दहा टक्के कोरम पुर्ण होण्यासाठी उपस्थिती हवी असते, यापैकी हे 50 टक्के महिला उपस्थित असतील तरच कोरम पूर्ण होतो, पण कोरम पूर्ण नसताना गावसभा घेण्यामागचे गौडबंगाल काय असा सवाल खोतवाडी ग्रामस्थ मधून केला जात आहे. कोरम पुर्ण नसतानाही गाव सभा का घेतली गेली? कशासाठी घेतली? आणि कोणाच्या हितासाठी घेतले असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोरम पुर्ण गावसभा तहकुब करणे गरजेचे असताना ही गाव सभा कोणाच्या हितासाठी घेतली गाव सभेत गावाच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर चर्चा होणे ऐवजी, गावातील बिअर बार दारु अड्यांना नाहरकती देण्याच्या विषयावर चर्चा करणे साठीच गाव सभा आहे का? गाव सभेचा मूळ हेतू बाजूला ठेवून नको त्या विषयावर चर्चा करण्यासाठी गाव सभा कोणाच्या सांगण्यावरून घेण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोरम पूर्ण नसताना गाव सभा घेणं म्हणजे गावसभेच्या नियमांच उल्लंघन होतय एवढ माहिती तर ग्रामविकास अधिकाऱ्यांना असायला हवे, ती तहकूब करण्या ऐवजी का आणि कशासाठी गाव सभा घेतली असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामसेवक सरपंच उपसरपंच यांनी कोरम पुर्ण नसताना गाव सभा तहकूब करणे अपेक्षित होते, मात्र ही गाव सभा का घेतली ? कोणाच्या हितासाठी घेतती ? कोणाच्या सांगण्यावरून घेण्यात आली ? अशी चर्चा गावभर सुरू आहे. सदर गाव सभेची माहिती देण्यास मात्र खोतवाडी ग्रामपंचायत कडून टाळाटाळ केली जात आहे. ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारावर काही लोकप्रतिनिधीं कडून नाराजी व्यक्त होत आहे.



टिप्पण्या