बेघरांना घरकुल देत नसाल तर महाराष्ट्रातून कर्नाटकात राहण्यास जाण्यास परवानगी द्या हुपरीतील बेघरांचा प्रशासनाला इशारा
शहरातील बेघरांना प्रधानमंत्री आवास योजनेतून
स्वतःची हक्काचे घर मिळावे यासाठी धडपडत आहेत
पण शासन दरबारी फक्त कागदोपत्रांचा खेळ सुरू आहे.
त्यामुळे येथील बेघर आणि छत्रपती राणी इंदुमती देवी बेघर संघटनेचे
अध्यक्ष विद्याधर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली
नगरपरिषद कार्यालयाजवळ ठिय्या आंदोलन करून
आज शेजारच्या कर्नाटक राज्यात ज्याप्रमाणे घरकुल योजना राबवली जात आहे
तशी महाराष्ट्रात राबवण्याची आणि महाराष्ट्र शासनाने ताबडतोब आमच्या मागणी मान्य करावे व न्याय द्यावा
अन्यथा आम्हास कर्नाटक राज्यात राहण्याची परवानगी द्यावी
असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला
सुरुवातीस येथील गट नंबर ९२५ ही जमीन मागणी केली होती
त्या संदर्भात सर्व शासकीय कार्यवाही पूर्ण झाली होती
दरम्यान ही जमीन न्यायप्रविष्ठ झाल्याने
नगरपरिषदेकडे पर्यायी जागा मागणी करण्यात आली
त्यामुळे नगरपरिषदेचे सरकार हक्क गट नंबर ७९५ पैकी जमीन देण्याचा ठराव करून
तसा प्रस्ताव दिनांक २४/०२/२०२३ रोजी मा.जिल्हाधिकारीसो यांच्याकडे दाखल केला
त्या अनुषंगाने अप्पर तहसीलदार इचरकंजी यांनी
०६/०७/२०२३ रोजी त्रुटी पूर्तता करणे बाबत पत्र दिले
पण अध्याप नगरपरिषद त्या त्रुटीची पूर्तता करू शकत नाही
यासंदर्भात संघटना सतत पाठपुरावा करत आहे.
ही त्रुटींची पूर्तता ताबडतोब करून तसा परिपूर्ण प्रस्ताव
मा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे अंतिम जागा मंजुरीसाठी पाठवा
या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले
या विलंबाबाबत आंदोलक आक्रमक झाले होते.
त्यामुळे सरकारला प्रशासकाला नामुष्कीजनक इशारा देण्यात आला आंदोलनात
माजी जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब गाट,सरपंच मंगलराव माळगे,
मा. सरपंच नगरसेवक दौलतराव पाटील
स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष राजाराम देसाई
शिवसेना शहरप्रमुख नितीन गायकवाड
अशोक बल्लोळे,सुनील कोरे,मनोज पाटील
सचिन कोरे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
आंदोलनात विद्याधर कांबळे,उदय कगंणे,
दिनकर कांबळे,यशवंत सरोदे,दिलीप जाधव,
जयश्री आवळे,कविता साळुंखे, झाहीराबी तुरेवाली,सौ शोभा तळेकर
यांच्यासह 150 हून अधिक महिला पुरुष सहभागी झाले होते
टिप्पण्या