आ.मेघना बोर्डीकरां मुळे जखमी व्यक्तीचे प्राण वाचले.
शिवाजी शिंदे
परभणी : दि.27 जिंतूर ते जालना या महामार्गावर अकोली पाटीजवळ रानडुकरा च्या जोरदार धडकेने गंभीर जखमी होवून रस्त्यावर कोसळलेल्या एका मोटारसायकल स्वारास आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी थेट मदतीचा हात दिल्याने त्या मोटार सायकलस्वाराचे प्राण वाचले.आमदार बोर्डीकर या जिंतूरहून आपल्या नियोजित दौर्यास निघाल्या तेव्हा अकोली पाटीजवळ एक मोटारसायकल स्वार रस्त्यावर जखमी अवस्थेत विव्हळतांना आढळला. परंतु, त्यास ये-जा करणार्या कोणीही मदतीचा हात दिला नाही. आमदार सौ. बोर्डीकर यांनी तात्काळ गाडी थांबवून आपल्या सहकार्यांच्या मदतीने या जखमीस उचलून स्वतःच्या गाडीतून जिंतूरच्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचारार्थ रवाना केले. बाळासाहेब चढाव (वय 56) असे या जखमी व्यक्तीचे नाव असल्याचे कळले असून त्या व्यक्तीची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही हाती आली आहे.
टिप्पण्या