फोटो गॅलरी राजा गणेश मंडळाला खासदार संजय जाधव (बंडू बॉस) यांची भेट.
शिवाजी शिंदे
सेलू : दि.27 रोजी नूतन महाविद्यालय रोड येथे ("राजा फोटो गॅलरी गणेश मंडळ'') परभणीचे लोकप्रिय खासदार संजयजी जाधव (बंडू बॉस) यांना फोटो गॅलरी चे संचालक व मित्र मंडळ यांनी श्री गणरायाची ची आरती करण्यासाठी निमंत्रित केले असता त्यांच्या प्रेमाखातर रात्री नऊ वाजता सेलूत आगमन करून त्यांच्या विनंतीला मान देऊन श्री गणरायाची महाआरती केल्यानंतर ते तरुणांना संबोधित करताना म्हणाले की, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नौकरीच्या पाठीमागे न लागता स्वतः छोट छोटया उद्योगाकडे लक्ष देण्याकडे कल दिला पाहिजे.मुलांनी लहान मोठे उद्योग व्यवसाय सुरू करून आपले व समाजाचे नावलौकिक वाढविले पाहिजे.कुठलाही व्यवसाय हा छोटा किंवा मोठा नसतो.आपण किती कौशल्याने आणी गुणवत्ते ने तो विकसित करतो याला महत्व आहे. आज श्रीकांत झुटे यांनी स्पर्धेच्या काळात आपल्या स्वतःच्या गुणवत्तेवर फोटो गॅलेरी चा व्यवसाय निवडून त्यात आपल्या कल्पकतेने तो कसा चांगला विकसित होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.तरुणांनी नव नवीन व्यवसायाकडे वळले पाहिजे असे सांगितले. याप्रसंगी सेलूचे लोकप्रिय नगरसेवक मनीष भाऊ कदम, माजी सभापती रणजित गजमल,शहर प्रमुख नाथा खांडेकर,फोटो गॅलरीचे संचालक श्रीकांत झुटे,अक्षय साळवे,संदीप गजमल,सोमेश गजमल,केदार शिंदे,अक्षय सापनार,उमेश खरावणे,नवनाथ खरात ओमकर जोशी,अभिषेक मगर,अक्षय बागल ऋषी अंभूरे,अभिजित आवटे आदी सह परभणी जिल्हाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पण्या