हुपरी नगरपरिषदेचा अजब कारभार अधंळ दळतय कुत्र पीठ खातय
पण यांना हुपरीकर वासियानी धीर देत सावरले व अदांजे 270 कुटुंबाना पुरग्रस्त योजने अंतर्गत हुपरी येथील गट नबंर 1756,1757,1758,1759,1760
येथे पुरग्रस्तभागातील लोकांना दिड गुटां जागा देऊन घर बांधून दिली.
पण या जागेची नोंद हुपरीत केली गेली नाही
या जागेची हद्द व सर्व्हे व झोन हुपरी हद्दीत आहे.
पण याचा महसुल घरफाळा, पाणीपट्टी,कर इगंळी ग्रामपंचायत वसूल करते.
हद्द हुपरीची असताना इगंळी ग्रामपंचायत कसा काय महसुल गोळा करते.
हा अजब कारभार अजुनही नगरपरिषद यांच्या लक्षात आला नाही.
यावरून नगरपरिषदेचा आधंळा कारभार लक्षात येतो.
हुपरीकर इकडे भरमसाठ वाढीव पाणीपट्टी, गाळाभाडे,घरफाळा वाढीचा विरोध करत असताना
इकड मात्र दुसरीच खाऊन जात आहेत.
हा महसुल हुपरी नगरपरिषद यांना लाखो रुपये गोळा करून देऊ शकतो.
आता तरी नविन मुख्याधिकारी लक्ष देणार का की ते पण मागच्यासारखे पुढे चालु ठेवणार
अशी चर्चा गावात होत आहे.
आपल असताना सोडुन गावतल्या लोकांना वसुलीसाठी कायदा दाखवणे कितपत योग्य आहे.
टिप्पण्या