मोबाईल जबरी चोरी प्रकरणी 10 जणाना अटक हुपरी पोलीस यांची मोठी कारवाई
हुपरी सागर पाटील - तळदंगे कमानी जवळ भाजी घेऊन येत असताना अनिल अंन्तराम भरतवाज (मुळ गाव रा बेलवरीया जगंल उत्तर प्रदेश) सध्या साऊडं कास्टिंग MIDC कागल हे भाजी घेऊन जात असता
जबरदस्ती (विवो) कपंनीचा मोबाईल बिना नबंरची स्पलेडंर वरून येऊन
हिसकावून घेऊन पसार झाले प्रकरणी दिपक धोत्रे व शाईद पठाण दोघे (रा रुई)
या दोघांना पुर्वी अटक करून कलम 392,34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता
यात मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता होती त्याअनुशंगाने
हुपरी पोलीस तपास करीत होते.
आजअखेर तपासाअंती 10 जणांना अटक करून 392,34 प्रमाणे 124 कलम गुन्हा दाखल करण्यात आला
सदर मोबाईल चोरी करत असता लोकांच्या मदतीने व गावकामगार पोलीस पाटील समीर मुल्लाणी याच्या साथीने आरोपींना पकडण्यात आले.
गुन्हा अनुषंगाने आरोपी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी यापुर्वी चोरी केलेले मोबाईल असेच चोरल्याची कबुली दिली
यात ऋषिकेश हुल्ले,साहिल कुमनाळे,
फराज हिम्मत मुजावर,आयाज अमिन मुजावर,
हे पण या चोरीवेळी सोबत होते त्यांना व सौरभ मगदुम,शुभम भिसे,
अजय पाटणकर,प्रमोद लोहार
सर्व राहणार रूई यांना अटक करून त्यांच्याकडून 25 मोबाईल हँडसेट 203000/- (दोन लाख तीन हजार) व 90000/- (नवद हजार) किमतीच्या दोन मोटरसायकल असे एकूण 2093000/- (दोन लाख त्र्यान्हव हजार)
किमतीचा मुद्देमाल जप्त करून एकुण 10 आरोपींना अटक केली आहे.
याकामी जिल्हापोलिसप्रमुख महेंद्र पंडित,अप्पर पोलीस अधीक्षक निलेश खाटमोडे-पाटीलसो,
मा उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे,
यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय किशोर शिंदे,पोलीस निरीक्षक गणेश खराडे,
रावसाहेब हजारे,विठ्ठल कोले,अल्पेश पोटुकले,
प्रभाकर काबंळे, सात्तापा चव्हाण, किरण पवार
आदींनी तपासकामी कारवाई केली.

टिप्पण्या