सेलूच्या रामबाग मित्र मंडळाचा 31फुटी शिवलीग चा देखावा.
शिवाजी शिंदे
सेलू :-येथील मारवाडी गल्ली येथील राममंदिर येथील रामबाग मित्रमंडळाच्या गेल्या साठ वर्षांपासून दर वर्षी अनोखे देखावे,झांक्या गणेश मूर्ती समोर आयोजित करण्यात येत असतात. हे देखावे दर वर्षी नव नविन असतात. गेल्या साठ वर्षा पासून सदरील कार्यक्रम घेण्यात येत आहेत. मागच्या वर्षी केदारनाथ मंदिर चा देखावा होता. सर्वात चांगला देखावा म्हणून या रामबाग गणेश मंडळाला पुरस्कार मिळाला. यामुळे भाविकांना नेहमीच या गणेश मंडळाच्या देखाव्याचे आकर्षण जास्त असते. विविधांगी कार्यक्रम दरवर्षी घेत असल्याने या वर्षी नवीन काही तरी आकर्षण असावे म्हणून 31फुटी शिवलिंग चा देखावा करण्यात आला आहे. या मध्ये प्रत्येक भाविक आपल्या हाताने 31फुटी शिवलिंग चा जलाभिषेक करता येईल व 11 फुटी नंदी च्या मुखातून प्रसाद मिळेल अश्या प्रकारे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून भाविकांना आकर्षित करण्यात मंडळाला यश मिळाले आहे. दररोज शेकडो भाविक भक्त येऊन देखाव्याचा आनंद घेत आहेत.दररोज सामूहिक महाआरती चे आयोजन करण्यात येते. या आरती मध्ये शहरातील लोकप्रतिनिधी,प्रतिष्ठित नागरिक भाविक भक्त यांच्या हस्ते श्रीची आरती महापूजा आयोजित करण्यात येत असते. आज 8 वाजता या गणेश मूर्तीची पूजा करण्याचा सन्मान माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, माजी उप नगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे यांना देण्यात आला.त्यांच्या शुभ हस्ते श्रीची आरती व महापूजा संपन्न झाली. यावेळी संजय लोया,बंडूशेठ तिवारी व सर्व गणेश मंडळाचे सदस्य यांनी सहभाग घेतला. सर्व रामबाग गणेश मित्र मंडळ चे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.
टिप्पण्या