श्रीमती आ. रा. पाटील कन्या महाविद्यालयात बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात संपन्न....
इचलकरंजी : कवीसरकार यांचेकडून प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते उद्घाटन तर , गोवा येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रो. डॉ. सोमनाथ कोमरपंत बीजभाषक ....... येथील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात मराठी, हिंदी, इंग्रजी,आणि IQAC या विभागांच्या वतीने एक दिवसीय बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे. 21 व्या शतकातील मराठी, हिंदी व इंग्रजी साहित्यातील सामाजिक व सांस्कृतिक संदर्भ या मुख्य विषयाच्या अनुषंगाने हे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन मा. डाॅ. आर. आर. कुंभार , प्राचार्य, विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या हस्ते झाले. सध्या समाजात दलित आणि सवर्ण यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे. परंतु भाषेचा, साहित्याचा अभ्यास करताना समाजाचा विचार होणे गरजेचे आहे,असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. बीजभाषक म्हणून प्रो.(डॉ.)सोमनाथ कोमरपंत ( माजी मराठी विभाग प्रमुख, गोवा विद्यापीठ, गोवा ) हे उपस्थित होते, त्यांनी आपल्या बीजभाष...